मेहतांचे सेनेवर ‘लाचअस्त्र’
By admin | Published: July 8, 2017 05:44 AM2017-07-08T05:44:47+5:302017-07-08T05:44:47+5:30
परिवहन सेवा चालवण्याचा ठेका घेणाऱ्या दिल्लीच्या शामा शाम सर्व्हिसेसच्या राधेश्याम कथोरिया याला व परिवहन विभागातील
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड : परिवहन सेवा चालवण्याचा ठेका घेणाऱ्या दिल्लीच्या शामा शाम सर्व्हिसेसच्या राधेश्याम कथोरिया याला व परिवहन विभागातील लिपीक आनंद गबाळे याला भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत अटक करवली. हे दोघे मेहता यांना २५ लाखांची लाच देण्याकरिता आले होते. कथोरियाने अन्य पक्षाचे आमदार व नगरसेवक यांना ठेका मिळण्याकरिता लाच दिल्याची कबुली दिल्याने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकारण रंगणार आहे.
महापालिकेची परिवहन सेवा चालवण्यासाठी अनेकवेळा निविदा मागवून प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर दिल्लीच्या ठेकेदाराची निवड झाली. २९ जूनच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर झालेल्या या प्रस्तावाला भाजपाने विरोध केला तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसने पाठिंबा दिला होता. हा निर्णय रद्द करण्याची मागणी मेहता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.