मीरा-भार्इंदरमध्ये आॅटोरिक्षांची बेकायदा २५ टक्के भाडेवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 03:09 AM2018-11-14T03:09:49+5:302018-11-14T03:10:25+5:30

मीरा-भार्इंदरमध्ये रिक्षाचालकांनी दोन दिवसांपूर्वी परस्पर भाडेवाढ करून प्रवाशांची लूट सुरू केली आहे. ही भाडेवाढ तब्बल २५ टक्के इतकी आहे.

Meira-Bhairindar's illegal 25 percent fare hike | मीरा-भार्इंदरमध्ये आॅटोरिक्षांची बेकायदा २५ टक्के भाडेवाढ

मीरा-भार्इंदरमध्ये आॅटोरिक्षांची बेकायदा २५ टक्के भाडेवाढ

Next

भार्इंदर : मीरा-भार्इंदरमध्ये रिक्षाचालकांनी दोन दिवसांपूर्वी परस्पर भाडेवाढ करून प्रवाशांची लूट सुरू केली आहे. ही भाडेवाढ तब्बल २५ टक्के इतकी आहे. इंधन दरवाढीमुळेच भाडेवाढ केल्याचे रिक्षाचालकांकडून सांगण्यात येत आहे. शहरात तीन हजारांहून अधिक रिक्षा आहेत. लांब अंतरावर जाणाऱ्या प्रवाशांकडून मीटरऐवजी अव्वाच्यासव्वा भाडे रिक्षाचालकांकडून बेकायदा वसूल केले जात आहे. हा प्रकार चार वर्षापूर्वी सुरू होता. त्याविरोधात अनेक तक्रारी प्रादेशिक परिवहन विभागाकडे केल्यानंतर शहरातील रिक्षांना मीटर बसविणे सक्तीचे केले. त्यालाही येथील रिक्षा चालकांनी केराची टोपली दाखवत मीटरऐवजी शेअर भाडे सुरूच ठेवले. त्यावेळी पाच रूपये किमान भाडे वसूल केले जात होते. त्यानंतर २७ डिसेंबर २०१४ मध्ये रिक्षाचालकांनी परस्पर २५ टक्के भाडेवाढ करत सात रूपये किमान भाडे निश्चित केले. काही महिन्यानंतर पुन्हा त्यात एक रूपयाची वाढ केली. त्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाची कोणतीही परवानगी घेतली नाही.

दोन दिवसांपासून पुन्हा त्यात सुमारे २५ टक्के परस्पर वाढ करून किमान भाडे आठ रुपयांवरुन १० रूपये केले. या परस्पर भाडेवाढीबाबत रिक्षाचालकांनी काही संघटनांच्या पदाधिकाºयांनाही विश्वासात घेतले नसल्याची बाब समोर आली आहे.
मीटरऐवजी शेअर भाडे वसूल करत किमान एका रिक्षात तीनपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जातात. त्यावर स्थानिक वाहतूक कर्मचारी व पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्याने येथील रिक्षाचालकांचा मनमानी कारभार सुरू आहे.

रिक्षा भाडेवाढीबाबत आपल्याला कोणतीही माहिती दिलेली नाही. भाडेवाढ प्रादेशिक परिवहन विभागाच्या परवानगीनेच लागू करावी, यावर आम्ही ठाम असून परस्पर भाडेवाढ झाली असल्यास ती बेकायदा आहे.
- देवेंद्र शेलेकर, अध्यक्ष, मीरा-भार्इंदर रिपाइं (अ) रिक्षा चालक-मालक संघटना

काही वर्षांपूर्वी प्रादेशिक परिवहन विभागाने मीरा-भार्इंदर शहरातील काही मार्गांसाठी शेअर भाडे वसुलीला मान्यता देऊन त्याचे दर निश्चित केले होते. यंदाच्या भाडेवाढीबाबत मात्र कोणतीही माहिती नाही.
- नंदकिशोर नाईक
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

बहुतांश रिक्षा सीएनजीवर चालविल्या जातात. त्यांचे दर वाढल्याने नाइलाजास्तव भाडेवाढ करावी लागली.
- रामदास ईरवणे रिक्षाचालक

सामान्य प्रवाशांसाठी करण्यात आलेली २५ टक्के भाडेवाढ अन्यायकारक असून ती रद्द करावी.
- शालिनी अडसुळे
प्रवासी

Web Title: Meira-Bhairindar's illegal 25 percent fare hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.