मीरा-भार्इंदरचे ११ हजार मतदार आयोगाने वगळले

By admin | Published: July 5, 2017 06:15 AM2017-07-05T06:15:22+5:302017-07-05T06:15:22+5:30

पुरवणी मतदारयादीत नवमतदारांची नावे दहा हजारांनी वाढून ५१ हजारांवर गेल्याने नोंदणी अधिकारी व पालिका प्रशासन आरोपांच्या फैरीत

Meira-Bharinder's 11 thousand voters excluded | मीरा-भार्इंदरचे ११ हजार मतदार आयोगाने वगळले

मीरा-भार्इंदरचे ११ हजार मतदार आयोगाने वगळले

Next

लोकमत न्युज नेटवर्क
भाईंदर : पुरवणी मतदारयादीत नवमतदारांची नावे दहा हजारांनी वाढून ५१ हजारांवर गेल्याने नोंदणी अधिकारी व पालिका प्रशासन आरोपांच्या फैरीत सापडले असताना अखेर निवडणूक आयोगाने तब्बल ११ हजार नावे वगळली आहेत. चुकीच्या मतदार याद्यांमुळे अडचणीत आलेल्या पालिका प्रशासनाने आधी वाटलेल्या यादीच्या बदल्यात नवी यादी देण्यास सुरवात केली आहे.
मीरा-भार्इंदरच्या पालिका निवडणुकीसाठी ५ जूनपर्यंत मतदार नोंदणी झाली. नोंदणी अधिकारी जे. एस. पंडित यांनी २१ हजार २७० नव्या मतदारांची नोंद केली. ओवळा-माजीवड्यात स्मितल यादव यांनी २० हजार ३६६ नव्या मतदारांची नोंद केली. प्रत्यक्षात ४१ हजार ६३६ जणांनी नोंदणी केली असली, तरी पालिकेच्या पुरवणी यादीत ५१ हजार १९४ मतदार झाल्याने खळबळ उडाली.
आधीच पंडित व यादव या अधिकाऱ्यांवर पडताळणी न करताच बोगस नोंदणी, विशिष्ट पक्षाच्या लोकांना झुकते माप देणे आदी आरोप करत आमदार प्रताप सरनाईक, काँग्रेसचे प्रमोद सामंत, अनिल सावंत, बर्नड डिमेलो आदींनी कारवाईची मागणी केली होती.
मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात टाकणे, मतदारयादी आणि डाटाबेसमधील तफावतीमुळे इच्छुक, नगरसेवक त्रस्त झाले होते. महापौर गीता जैन यांनीही अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती.
यादीतील तफावतीबाबत प्रचंड तक्रारी आल्याची दखल घेत आयोगाने पुरवणी मतदारयादीची चौकशी करत दोनदा ते १८ वेळा नोंद झालेली १० हजार ९८५ नावे कमी केली. त्यामुळे आता मूळ व पुरवणी यादीत पाच लाख ९१ हजार २३५ इतके मतदार उरले आहेत. मतदार याद्यांमधील अनागोंदी व घोळ पाहता अखेर आयोगाने सोमवारी पुन्हा पालिकेला मुदतवाढ दिली आहे. आता ६ जुलै पर्यंत हरकती सुचना देता येणार आहे.

Web Title: Meira-Bharinder's 11 thousand voters excluded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.