विजेत्यांनी केले बक्षीस वितरण यादगार!
By admin | Published: February 8, 2016 02:34 AM2016-02-08T02:34:11+5:302016-02-08T02:34:11+5:30
रोबो डान्स, सिंड्रेला, लावणी नृत्यातील कलाकारांची अदाकारी ठाणेकर प्रेक्षकांनी अनुभवली. निमित्त होते विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरणाचे
ठाणे : रोबो डान्स, सिंड्रेला, लावणी नृत्यातील कलाकारांची अदाकारी ठाणेकर प्रेक्षकांनी अनुभवली. निमित्त होते विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरणाचे. विशेष म्हणजे यावेळी मिस ठाणे किताब विजेती श्रद्धा गायकवाड व परीक्षक सचिन गवळी यांनी सादर केलेल्या रॅम्प वॉकला उपस्थितांनी टाळयांच्या कडकडाटात दाद दिली.
ठाणे कला-क्र ीडा महोत्सवातील निवडक व अव्वल ठरलेल्या कार्यक्रमांना ठाणेकर रासकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात रविवारी रंगलेल्या कार्यक्र माने महोत्सवाचा कळस अनुभवायला मिळाला.
कार्यक्र माची सुरु वात ढोलताशा पथक व प्रकाश योजनेच्या जुगलबंदीने झाली. या जुगलबंदीला दर्दी प्रेक्षकांकडून दाद मिळाली. दिवंगत कवी मंगेश पाडगावकर यांना गीतांच्या माध्यमातून मानवंदना वाहण्यात आली. त्याचबरोबर पथनाटय, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेतील विजेते, एकपात्री अभिनय स्पर्धेतील लहान व मोठ्या गटातील गुणवंतांचे बहारदार परफॉर्मन्स पाहावयास मिळाले. महोत्सवात आकर्षण ठरलेल्या लघुचित्रपट स्पर्धेतील पहिल्या दोन्ही लघुपटांना प्रेक्षकांची वाहवा मिळाली. टाळ््यांच्या कडकडाटात उत्तरोत्तर कार्यक्रम रंगत गेला. यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते चित्रकला व रांगोळी, पाककला स्पर्धा, मिस, मिस्टर व मिसेस ठाणे स्पर्धेतील विजेते, पथनाट्य स्पर्धेतील गुणवंत, नृत्य, एकपात्री अभिनय, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धा, लघुपट, पथनाट्यामधील विजेत्यांना गौरविण्यात आले. त्याचबरोबर महोत्सवातील विविध स्पर्धांसाठी समन्वयक व परीक्षक म्हणून काम पाहणाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी महापौर संजय मोरे, सभागृह नेत्या अनिता गौरी, क्रीडा समितीचे सभापती संभाजी पंडीत, नौपाडा प्रभाग समितीचे अध्यक्ष हिराकांत फर्डे, उज्वला फडतरे, रामभाऊ फडतरे, उपायुक्त तथा माहिती व जनसंपर्कअधिकारी संदीप माळवी, प्रा. प्रदीप ढवळ, दिग्दर्शक किरण नाकती, अभिनेते नयन जाधव व इतर उपस्थित होते.