झांबिया, केनिया आणि राँडामध्ये साजरा झाला मासिक पाळीचा सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:38 AM2021-05-24T04:38:58+5:302021-05-24T04:38:58+5:30

ठाणे : मासिका महोत्सव हा मासिक पाळीचा सोहळा झांबियासह केनिया आणि राँडामध्ये अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. मासिक पाळीबद्दल ...

Menstruation ceremonies were celebrated in Zambia, Kenya and Randa | झांबिया, केनिया आणि राँडामध्ये साजरा झाला मासिक पाळीचा सोहळा

झांबिया, केनिया आणि राँडामध्ये साजरा झाला मासिक पाळीचा सोहळा

Next

ठाणे : मासिका महोत्सव हा मासिक पाळीचा सोहळा झांबियासह केनिया आणि राँडामध्ये अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. मासिक पाळीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी अतिशय कल्पक मार्गांचा वापर केला गेला.

लुसाका या राजधानीच्या शहरात प्लॅन इंटरनॅशनल झांबिया या संस्थेमार्फत लोकसंगीत, संगीत-नृत्य त्याचबरोबर कापडी पॅड व मेन्स्ट्रुलकप वापरण्याची प्रात्यक्षिकांतून मासिक पाळीबद्दल संवाद साधण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले. चित्र रेखाटन, डिजिटल स्क्रीन अशाप्रकारे गर्भाशयाच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या. याचबरोबर गर्भाशयाच्या आकाराचा केकदेखील कापण्यात आला. या सगळ्यातून, मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया असून त्यावर मोकळेपणाने बोलणे गरजेचे आहे, यावर भर दिला. अपेक्षेपेक्षा दीडशे टक्क्यांनी जास्त संख्येने उपस्थिती या उपक्रमास लाभली. म्युज फाउंडेशनच्या वतीने ठाण्यातून मासिका महोत्सवाची सुरुवात झाली असून, त्याअंतर्गत तीन देशांत हा उत्सव साजरा करण्यात आला.

केनियातदेखील पार पडला सोहळा

लिव्ह हेल्दी इनिशिअएटिव्हज तसेच यूएनएफपीए केनिया, रिअल रिलिफ, वॉश अलायंस केनिया आणि केनिया सरकार यांच्या सहविद्यमानाने मासिक पाळी आरोग्याविषयीच्या सरकारी धोरणाबाबत चर्चा पार पाडली. या चर्चेअंती मासिक पाळी आरोग्यासंबंधी सरकारी धोरणात, आणखी काम व गुंतवणुकीची गरज आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला. मासिक पाळीबद्दल शिक्षण देणे हे अनेक शाश्वत विकास ध्येये (एसडीजी) साध्य करण्यासाठी, तसेच शाश्वत मार्गाने मासिक पाळी हाताळण्यासाठी महत्त्वाचे आहे. या सोहळ्याचे उद्दिष्ट हे विविध उपक्रमांतून मुला-मुलींना मासिक पाळीच्या सुरक्षित आणि निरोगी पद्धतीचं महत्त्व पटवून देणे होते.

राँडामध्ये दुकाटाझे यांनी विविध उपक्रम, मासिक पाळीवर आधारित खेळांचे आयोजन आणि ३०० पॅड्सचे वाटप करून हा सोहळा साजरा केला. मुला-मुलींचे लहान गट पाडून त्यांच्यात मासिक पाळीविषयी समूह चर्चा घेण्यात आली. पुढे या चर्चेमधील मुद्दे त्यांनी आणखी मोठ्या गटांसमोर मांडले. क्रीडा प्रकारांत सॅनिटरी नॅपकिन्स उचलण्याची शर्यत समाविष्ट होती. जी शर्यत बघणाऱ्यांनी स्पर्धकांचा जोश वाढवण्याचे काम केले.

----------------

Web Title: Menstruation ceremonies were celebrated in Zambia, Kenya and Randa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.