ज्येष्ठांचे मानसिक आरोग्य  महत्त्वाचे- के.पी. रघुवंशी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2018 04:51 PM2018-03-01T16:51:50+5:302018-03-01T16:51:50+5:30

सेवा निवृत्तीनंतर आयुष्यात पोकळी निर्माण होते. यासाठी जेष्ठांनी शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्यही जपावे, असा सल्ला माजी पोलीस अतिरिक्त महासंचालक के.पी रघुवंशी यांनी दिला.

Mental health is important for senior citizens - KP Raghuvanshi | ज्येष्ठांचे मानसिक आरोग्य  महत्त्वाचे- के.पी. रघुवंशी

ज्येष्ठांचे मानसिक आरोग्य  महत्त्वाचे- के.पी. रघुवंशी

Next

डोंबिवली - सेवा निवृत्तीनंतर आयुष्यात पोकळी निर्माण होते. यासाठी जेष्ठांनी शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्यही जपावे, असा सल्ला माजी पोलीस अतिरिक्त महासंचालक के.पी रघुवंशी यांनी दिला. रामकृष्ण माधव पाटील आणि ताराबाई रामकृष्ण पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात रघुवंशी बोलत होते. डॉ. अरुण पाटील यांच्या संजीवनी हॉस्पिटलच्या ३८ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम झाला. यावेळी मार्गदर्शन करतांना रघुवंशी पुढे म्हणाले, शारीरिक आरोग्य महत्त्वाचे आहे.  त्यामुळे योगा, व्यायाम गरजेचा आहे. तरुणपिढीसोबत समन्वय साधतांना तुलना करू नये, असा सल्लाही रघुवंशी यांनी दिला. 

कायदेतज्ज्ञ शिरीष देशपांडे यांनी उपस्थितांना भविष्यकाळाची चिंता करण्यापेक्षा वर्तमानकाळ आनंदामध्ये जगा असा सल्ला दिला. यावेळी उत्कृष्ट पेन्शनर म्हणून श्रीधर राजाराम भुर्के यांचा सत्कार करण्यात आला. तर उत्कृष्ट पेन्शनर दाम्पत्य म्हणून शरद नारायण भिडे आणि जया भिडे यांचा गौरव करण्यात आला. गेली आठ वर्ष हा पुरस्कार देण्यात येत आहे. यावर्षीपासून समाजसेविका ज्योती शंकर साटवणे यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट चतुरस्त्र व्यक्तीमत्व पुरस्कार देण्यात येत आहे.  यावर्षीचा प्रथम पुरस्कार ज्योती गुप्ता हिला देण्यात आला.  
यावेळी श्रृती शिंदेहिने दिव्यांसह योगाची प्रात्यक्षिके सादर केली. प्रविण मानकर, पल्लवी शेट्टी, शांताराम मनवे आदींचा, तसेच पोलीस अधिकारी रविंद्र वाडेकर यांचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

गायक गिरीष डोईफोडे यांनी गाणे सादर केले. या कार्यक्रमाला पोलीस अधिकारी पवार, डॉ. मंगेश देशपांडे, मनिष चितळे, एसीपी टकले, महाजन, दिलीप खन्ना, सुरेश वाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.  डॉ. अरुण पाटील यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. गिरीष डोईफोडे आणि अलोक काटदरे यांच्या गाण्यांनी या कार्यक्रमाचा समारोप झाला. या कार्यक्रमासाठी दीपा बापट आणि संजीवनी हॉस्पिटलच्या कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Mental health is important for senior citizens - KP Raghuvanshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.