मनोरुग्णालय कामगारांचे आंदोलन, बारा वर्षांपासून पगारवाढ नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 01:32 AM2020-03-06T01:32:50+5:302020-03-06T01:32:56+5:30

मनोरुग्णालयातील कंत्राटी सफाई कामगारांना मागील १० ते १२ वर्षे पगारवाढ झालेली नाही. त्यातच आहे तो पगारही वेळेवर हाती पडत नाही.

The mental health workers' movement has not been paid for twelve years | मनोरुग्णालय कामगारांचे आंदोलन, बारा वर्षांपासून पगारवाढ नाही

मनोरुग्णालय कामगारांचे आंदोलन, बारा वर्षांपासून पगारवाढ नाही

Next

ठाणे : येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातील कंत्राटी सफाई कामगारांना मागील १० ते १२ वर्षे पगारवाढ झालेली नाही. त्यातच आहे तो पगारही वेळेवर हाती पडत नाही. या दोन प्रमुख मागण्यांसह अन्य विविध १६ मागण्यांसाठी गुरुवारी कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर बसून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशाराही त्यांनी उपेक्षित दलित सामाजिक परिषदेच्या माध्यमातून दिल्याने रुग्णालयाची दैनंदिन साफसफाई व स्वच्छता ऐरणीवर आली आहे.
उपेक्षित दलित सामाजिक परिषदेच्या ठाणे शहराध्यक्षा सोनी चौहान यांच्या नेतृत्वाखाली मनोरुग्णालयातील ३५ महिलांसह ५५ पुरुष कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. सकाळी कामगार वेळेवर रुग्णालयात आले. मात्र, त्यांनी रुग्णालयाबाहेर बसून कामबंद आंदोलन सुरू केले. पुणे येथील मनोरुग्णालयातील कं त्राटी कामगारांना १२ हजार रुपये पगार मिळत आहे. पण, ठाण्यातील कामगारांना आठ हजार पगारही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यासह कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. वाल्मीकी सफाई कामगारांना शासन परिपत्रकाप्रमाणे पगार मिळावा, कायमस्वरूपी कामगारांप्रमाणे घरभाडे मिळावे, वर्षाला दोन गणवेश मिळावे, पगार १ ते १० तारखेदरम्यान मिळावा, यासह अन्य मागण्यांचे निवेदन आरोग्य सेवा मुंबई मंडळ ठाणे, उपसंचालक डॉ. गौरी राठोड यांना संघटनेने दिले आहे.

Web Title: The mental health workers' movement has not been paid for twelve years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.