मीरा भाईंदरची प्रस्तावित मेट्रो बिल्डर लॉबी व हितसंबंध गुंतलेल्या काही राजकारण्यांच्या फायद्याची

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2018 05:29 PM2018-01-01T17:29:14+5:302018-01-01T17:29:40+5:30

भार्इंदर पर्यंत येणारी प्रस्तावित मेट्रो ही बिल्डर लॉबी व त्यात गुंतलेल्या काही राजकारण्यांच्या फायद्यासाठी असल्याचा आरोप करत प्रस्तावित मेट्रो ही भार्इंदर रेल्वे स्थानकास जोडा.

Mera Bhainar's proposed Metro Builder Lobby and the interests of some politicians engaged in interest | मीरा भाईंदरची प्रस्तावित मेट्रो बिल्डर लॉबी व हितसंबंध गुंतलेल्या काही राजकारण्यांच्या फायद्याची

मीरा भाईंदरची प्रस्तावित मेट्रो बिल्डर लॉबी व हितसंबंध गुंतलेल्या काही राजकारण्यांच्या फायद्याची

Next

मीरारोड - भार्इंदर पर्यंत येणारी प्रस्तावित मेट्रो ही बिल्डर लॉबी व त्यात गुंतलेल्या काही राजकारण्यांच्या फायद्यासाठी असल्याचा आरोप करत प्रस्तावित मेट्रो ही भार्इंदर रेल्वे स्थानकास जोडा. तरच त्याचा खरया अर्थाने नागरीकांना लाभ मिळणार असल्याची मागणी जेलसपार्क चौपाटी कल्याण समितीचे डॉ. एम. एल. गुप्ता यांनी केली आहे.

मुंबईच्या दहिसर पर्यंत सद्या मेट्रोचे काम सुरु असुन महामार्गा वरुन ती मेट्रो पुढे मीरा भार्इंदर शहरात आणण्याची मागणी शहरातुन सातत्याने झाल्या नंतर अखेर मीरा भार्इंदर साठी पण मेट्रोची मंजुरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केली. त्या बाबतचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आल्या नंतर नुकतीच एमएमआरडीए ने प्रस्तावित मेट्रो स्थानकांची नांव मंजुरी साठी पाठवली होती. नामकरणा वरुन स्थानिक गावं, प्रमुख स्थळ सत्ताधारी भाजपाने डावलल्या बद्दल गोडदेव ग्रामस्थांनी आंदोलनाचा पावित्रा घेतलाय.

प्रस्तावित मेट्रो दहिसर वरुन काशिमीरा नाका व पुढे सावरकर चौकातुन इंद्रलोक - नवघर कडे तर एक मार्ग मॅक्सस मॉल कडुन सुभाषचंद्र बोस मैदाना पर्यंत जाणार आहे. परंतु भार्इंदर हे मुख्य रेल्वे स्थानक असुन मेट्रो त्याला मात्र जोडण्यात येणार नसल्याने नागरीकांनी आता मेट्रो भार्इंदरला जोडण्याची मागणी चालवली आहे.

भार्इंदर स्थानकास मेट्रो जोडल्यास भार्इंदर पुर्व व पश्चिम भागातील मोठ्या संख्येने राहणारया नागरीकांना खरया अर्थाने त्याचा फायदा होणार आहे. शिवाय पश्चिम रेल्वे ने चर्चगेट पासुन डहाणु पर्यंत प्रवास करणारया वा प्रवास करु इच्छीणारया प्रवाशांना सुध्दा मेट्रोचा उपयोग होईल. अन्यथा प्रवाशांना भार्इंदर स्थानका कडे वा तेथुन पुढे अन्य ठिकाणी ये जा साठी मॅक्सस मॉल, नवघर, इंद्रलोक वा सावरकर चौक (गोल्डन नेस्ट ) भागातुन रिक्षाचा भुर्दंड सोसावा लागुन वेळ व इंधन वाया जाणार आहे असे जेलसपार्क चौपाटी कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. एम. एल. गुप्ता यांनी सांगीतले. गुप्ता यांच्या सह समितीचे सचीव नरेंद्र गुप्ता , उपाध्यक्ष नरेंद्र उपाध्याय आदिंनी भार्इंदर स्थानकास मेट्रो जोडावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांसह खासदार, महापौर, आमदार, आयुक्त आदिंना केली आहे. केली आहे.

वास्तविक सावरकर चौक ते नवघर - इंद्रलोक व भार्इंदरच्या मॅक्सस ते बोस मैदान दरम्यान बिल्डर व सबंधित काही नेत्याने मोठ्या प्रमाणात जमीनी विकत घेतलेल्या आहेत. शिवा मोठ्या प्रमाणात नविन इमारतींची कामं सुरु आहेत. सद्या बांधकाम क्षेत्रात मंदी असल्याने विकासक व स्वत:च्या फायद्यासाठी मेट्रो त्या त्या भागात प्रस्तावित केल्याचा आरोप डॉ. गुप्ता यांनी केला आहे. भार्इंदर स्थानकास मेट्रो जोडण्याची खरी गरज असुन नागरीकांसाठी समिती आंदोलनाचा पावित्रा अन्य नागरीक, संस्थांसह मिळुन करण्याच्या प्रयत्नात असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Mera Bhainar's proposed Metro Builder Lobby and the interests of some politicians engaged in interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.