संदेश मौळे करणार एव्हरेस्टवर चढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 03:57 AM2018-10-28T03:57:59+5:302018-10-28T03:58:22+5:30
रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील ११ वी विज्ञान शाखेतील संदेश राजाराम मौळे याची आदिवासी विकास विभागाच्या ‘मिशन शौर्य २’ अंतर्गत एव्हरेस्ट शिखर चढाईसाठी निवड झाली आहे.
मोखाडा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील ११ वी विज्ञान शाखेतील संदेश राजाराम मौळे याची आदिवासी विकास विभागाच्या ‘मिशन शौर्य २’ अंतर्गत एव्हरेस्ट शिखर चढाईसाठी निवड झाली आहे.
मिशन शौर्य ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आदिवासी विभागातील विद्यार्थी विकासासाठीची विशेष योजना आहे. या निवडीने गभालपाडा आश्रम शााळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याने या आश्रम शाळेचे कौतुक केले जात असून संदेशला पुढील अडीअडचणी साठी संघटनेच्या माध्यमातून मदत केली जाईल व एव्हरेस्ट शिखर चढाई करून आल्यानंतर तालुक्यात जंगी मिरवणूक काढून त्याचे स्वागत केले जाईल असे आदिवासी विकास आश्रम शाळा शिक्षक कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सोमनाथ शेवाळे सरांनी लोकमतला सांगितले. यावेळी सर्व चाचण्या व प्रशिक्षणातील परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मुख्याध्यापक हरी पवार, क्रीडा शिक्षक शरद भामरे व शाळेतील सर्व शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.
या मोहिमेसाठी माझे शिक्षक भामरे सर शेवाळे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याने माझी यशस्वी निवड झाली व मी एव्हरेस्ट शिखर चढाई करून तालुक्याचे व माझ्या शाळेचं नावं उचवण्याच प्रयत्न करील.
- संदेश मौळे, निवड झालेला विद्यार्थी