१० लाखांच्या खंडणीकरिता पुजारीचे मेसेज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 06:55 AM2018-05-06T06:55:23+5:302018-05-06T06:55:23+5:30
व्यापारी इंटरनॅशनल फोन नंबर उचलत नसल्याने कुख्यात सुरेश पुजारी टोळीने त्यांना एसएमएसद्वारे खंडणीकरिता धमकावण्यास सुरुवात केली आहे.
उल्हासनगर : व्यापारी इंटरनॅशनल फोन नंबर उचलत नसल्याने कुख्यात सुरेश पुजारी टोळीने त्यांना एसएमएसद्वारे खंडणीकरिता धमकावण्यास सुरुवात केली आहे. व्यापारी मनीष भठिजा यांना एसएमएसद्वारे १० लाखांच्या खंडणीकरिता ठार मारण्याची धमकी आली असल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील व्यापाऱ्यांना पुजारी टोळीकडून खंडणीकरिता धमक्या येत होत्या. इंटरनॅशनल फोन क्रमांकावरून सातत्याने धमक्या येऊ लागल्याने आता व्यापारी असे क्रमांक पाहिल्यावर फोन उचलत नाहीत. त्यामुळे त्यांना पुजारी टोळीने एसएमएस करून धमकावण्यास सुरुवात केली. भठिजा यांच्याकडे १० लाख रुपयांच्या खंडणीसाठी एसएमएस आला आहे. उल्हासनगरातील केबल व्यापारी सच्चिदानंद याने खंडणी दिली नाही, म्हणून त्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करून व्यापाºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. पुजारीच्या कारवाया पुन्हा वाढल्या आहेत.
ज्योती कलानी यांची मागणी
च्आ. ज्योती कलानी यांनी विधानसभेत सुरेश पुजारीच्या मुसक्या आवळण्याची मागणी केली होती.
च्व्यापारी सुमित चक्रवर्ती यांच्यावर कॅम्प नं.-५ येथील एका कार्यालयात पुजारीच्या साथीदारांनी गोळीबार केला होता.