मेट्रोसारखी लोकल ठाण्यापर्यंतच धावणार?
By admin | Published: December 9, 2015 12:40 AM2015-12-09T00:40:17+5:302015-12-09T00:40:17+5:30
वाढत्या गर्दीमुळे होत असलेले लोकल अपघात रोखण्यासाठी मध्य रेल्वेने येत्या फेब्रुवारीपासून मुंबई ते ठाणे दरम्यान मेट्रोसारखी कमी प्रवासी बसू शकतील व अधिक प्रवासी उभे राहतील
अनिकेत घमंडी, डोंबिवली
वाढत्या गर्दीमुळे होत असलेले लोकल अपघात रोखण्यासाठी मध्य रेल्वेने येत्या फेब्रुवारीपासून मुंबई ते ठाणे दरम्यान मेट्रोसारखी कमी प्रवासी बसू शकतील व अधिक प्रवासी उभे राहतील, अशी आसन व्यवस्था असलेली लोकल सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ठाणे जिल्ह्यातील सुमारे २० लाख लोकल प्रवासी या सुविधेपासून वंचित राहणार आहेत.
फेब्रुवारीत मेट्रोच्या धर्तीवरील लोकलच्या आठ फेऱ्या सुरु होतील. अशाच लोकल हार्बर आणि ट्रान्स हार्बरवरही धावणार आहेत. हार्बर रेल्वेवर मध्य रेल्वे इतक्याच नव्या आठ फेऱ्या होतील. तर ट्रान्स हार्बरवर नव्या लोकलच्या २० फेऱ्या सुरु होणार आहेत. पुढच्या दोन महिन्यात मुंबई शहर, ठाणे आणि नवी मुंबईतील लोकल प्रवाशांना या नव्या लोकलची सेवा मिळेल, असं रेल्वेचं म्हणणं आहे.
गर्दीमुळे लोकलमधून पडून या वर्षात मुंबईत नोव्हेंबरपर्यंत एकूण ६९७ प्रवाशांचा मृत्यू झाला. यापैकी ४५३ जणांचा मृत्यू मध्य रेल्वेवर झाला आहे. अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर लोकलमधील अपघात रोखण्यासाठी आणि गर्दीला तोंड देण्यासाठी नवी आसन व्यवस्था असलेल्या लोकल गाड्या सुरू कराव्यात ज्यामध्ये डब्यांमध्ये उभे राहण्यासाठी जास्तीत जास्त जागा असेल, अशा सूचना तज्ज्ञांनी यापूर्वीच केल्या होत्या. पण ती लालफितीच्या कारभारात अडकल्याने विलंब झाला. शिवाय येणारी योजना प्रायोगिक तत्त्वावर असेल आणि तीही केवळ ठाणे स्थानकापर्यंत धावणाऱ्या गाड्यांमध्ये राबवली जाणार आहे.
दाटीवाटीने प्रवास करतात. यापैकी १०४ जण बसलेले असतात तर बाकीचे उभ्याने प्रवास करतात. पण नव्या मेट्रो सारख्या लोकलच्या डब्यामध्ये बसण्यासाठी फक्त ६६ सीट असतील आणि उर्वरीत अध्यार्हून अधिक जागा प्रवाशांना उभं राहण्यासाठी मिळेल. सर्व परवानग्यानंतर या लोकल दाखल होती, त्यानंतरच फास्ट लोकलचे थांबे वाढवण्याचा रेल्वेचा विचार आहे. सध्या ठाण्याच्या पुढील कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली व कल्याण स्थानकावर बहुसंख्य प्रवासी सकाळी गाडीत प्रवेश करताना झगडतात. त्यातील काही पडतात.
ठाण्यापर्यंत जाण्याकरिता ठाणे लोकलचा पर्याय असताना त्यापुढे गर्दीच्या गाडीतून जाणाऱ्या व तेथून येणाऱ्या प्रवाशांकरिता निदान आतमध्ये सुरक्षितपणे उभे राहण्याची सुुविधा हवी, असे प्रवाशांना वाटते. सीएसटी ते कल्याण दरम्यान फास्ट लोकल सध्या भायखळा,
दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडूप, मुलुंड, ठाणे आणि डोंबिवली या रेल्वे स्थानकांवर थांबतात. परंतु आगामी काळात सर्व फास्ट लोकल यापुढे विक्रोळी आणि परळ स्थानकांवरही थांबवण्याचा रेल्वेचा विचार आहे. यामुळे आगामी काळात समस्यांवर तातडीने तोडगा काढता यावा असे रेल्वेचे प्रयत्न आहेत.