मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोच्या कामाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 05:12 AM2019-09-15T05:12:37+5:302019-09-15T05:13:22+5:30
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली आहे.
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली आहे. या मार्गावर एकूण आठ स्थानके असून, या ठिकाणी मेट्रोच्या जागेत बॅरिकेड्स लावून भू-तांत्रिक तपासणीचे कामही सुरू करण्यात आले आहे. प्राधिकरणाच्या माध्यमातून मीरा-भार्इंदरमध्ये मेट्रोचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी ६ हजार ६०७ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. मीरा-भार्इंदर मेट्रोच्या मार्गावर काशिमीरा नाका, झंकार कंपनी स्टेशन, साईबाबा नगर स्टेशन, दीपक हॉस्पिटल येथे कामाला सुरुवात झाली आहे. या कामासाठी बॅरिकेड्सही लावण्यात आले आहेत. तीन ठिकाणी भू-तांत्रिक तपासणीचे कामही सुरू झाले आहे.
हा मार्ग सुमारे ११.१९२ कि.मी.चा असेल. त्यात दहिसर, पांडुरंगवाडी, मीरागाव, काशिगाव, साईबाबा नगर, मेडतीया नगर, शहीद भगतसिंग गार्डन, सुभाषचंद्र बोस स्टेडियम अशी एकूण आठ स्थानके आहेत. या मेट्रो मार्गासाठी भार्इंदरपाडा व दहिसर येथे कार डेपो प्रस्तावित करण्यात आला आहे.
मुंबई मेट्रोमार्ग १०चे भूमिपूजन
ठाणे आणि मीरा रोड शहरांना जोडणाऱ्या गायमुख-शिवाजी चौक-मुंबई मेट्रोमार्ग १०चे भूमिपूजन झाले असून या मेट्रोचा १.२ किमीचा मार्ग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जाणाºया घोडबंदर रस्त्याच्या बाजूने जाणार आहे.
राष्ट्रीय उद्यानातून जाणाºया घोडबंदर रोडच्या विस्तारीकरणाचा प्रकल्प महत्त्वपूर्ण नागरी वाहतूक प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला असून त्याला तत्काळ परवानग्या मिळवण्यासाठी प्राधिकरण सक्रिय झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
मुंबई मेट्रो ४च्या वडाळा-घाटकोपर-मुलुंड-कासारवडवली मार्गिकांचा विस्तार करण्यात आला असून ही मेट्रो कासारवडवली ते गायमुखपर्यंत पुढे विस्तारित करण्यात आली आहे. मीरा रोडकडे येण्यासाठीही मेट्रोमार्ग विकसित करण्यात येत असून ठाणे आणि मीरा रोड या मार्गावरील जोडणीसाठी ९.२०९ किमी लांबीच्या ८.५२९ किमी उन्नत आणि ०.६८ किमी भूमिगत मेट्रो मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. १ हजार ४३५ मिमी स्टँडर्ड गेजचा मार्ग असून चार उन्नत स्थानके या मार्गावर उभारण्यात येणार आहेत.
या मेट्रोची कारशेड मोघरपाडा येथे उभारण्यात येणार असून या प्रकल्पासाठी ८.१३ हेक्टर जमिनीची आवश्यकता भासणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जाणाºया घोडबंदर रोडच्या बाजूने या मार्गिकांची निर्मिती करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून त्यासाठी प्राधिकरणाकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
>२०११ ते २०१३
विस्तृत प्रकल्प अहवाल तयार
मेट्रो-३ चा मार्ग निश्चित
केंद्र सरकारला प्रस्ताव सादर
'जायका'कडून कर्ज मंजूर
केंद्र सरकारची मंजुरी
२०१३ ते २०१७
राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
राज्य सरकारची मान्यता
पूर्व पात्रता असलेल्या कंत्राटदारांना बोगदे व स्थानकांची स्थापत्य कामे
सल्लागारांची नियुक्ती
बोगद्याच्या कामासाठी निविदा मागवल्या.
२०१५ ते २०१७
बोगदे व स्थानकांची स्थापत्य कामे सुरू
इंजीन व डबे यासाठी निविदा
२०१७ ते २०२०
स्थापत्य कामांची पूर्तता
चाचणी व प्रमाणीकरण पूर्ण करणे
२०१५ ते २०१९
गिरगाव काळबादेवीतील पुनर्वसनाचा प्रश्न
प्रारंभी स्थलांतरास नकार
स्थानिकांसह राजकीय पक्षांची आंदोलने
राज्य सरकारचा हस्तक्षेप
पुनर्वसनासाठी खास पॅकेज जाहीर
प्रकल्पबाधितांचे समाधान
बोगदा खोदण्याची कामे जवळपास ५० टक्के पूर्ण
स्थानकांच्या उभारणीलाही सुरुवात