अंबरनाथमध्ये म्हाडा उभारणार राज्यातील सर्वात माेठी टाऊनशिप- जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 07:13 AM2022-06-03T07:13:31+5:302022-06-03T07:13:40+5:30

चिखलोली धरणाजवळील जागेचे सर्वेक्षण

MHADA to be set up in Ambernath The highest township in the state - Minister Jitendra Awhad | अंबरनाथमध्ये म्हाडा उभारणार राज्यातील सर्वात माेठी टाऊनशिप- जितेंद्र आव्हाड

अंबरनाथमध्ये म्हाडा उभारणार राज्यातील सर्वात माेठी टाऊनशिप- जितेंद्र आव्हाड

Next

अंबरनाथ : ‘अंबरनाथ शहरात म्हाडाकडून राज्यातील सर्वांत मोठी टाऊनशिप उभारण्यात येणार आहे. यासाठी चिखलोली धरणाला लागून असलेल्या २०० एकर जागेचे गुरुवारी ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षण करण्यात आले,’ अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

मुंबई आणि उपनगर परिसराची लोकसंख्या सध्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, हा वाढता भार मुंबईला पेलवणारा नाही. त्यात सध्या डोंबिवलीपुढे, म्हणजे फक्त अंबरनाथ आणि बदलापूरमध्येच मोकळ्या जागा शिल्लक आहेत. त्यामुळे या परिसरात म्हाडाकडून मेगा टाऊनशिप उभारण्यात येणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी सांगितले. ही टाऊनशिप आजवर म्हाडाने उभारलेल्या टाऊनशिपपैकी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी टाऊनशिप असेल, असे आव्हाड म्हणाले.

अंबरनाथ शहरात आतापर्यंत ‘म्हाडा’चा एकही प्रकल्प उभारण्यात आलेला नाही. मात्र, या परिसरास जी कनेक्टिव्हिटी आहे, त्यामुळे या भागाला सध्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच चिखलोली धरणाच्या बाजूला असलेली २०० एकर जागा खरेदी करण्याचा ‘म्हाडा’चा विचार आहे. येथे मोठी टाऊनशिप उभारली जाणार असल्याचे आव्हाड म्हणाले. 

जपानच्या सरकारी कंपनीची मदत घेणार

या सर्वांत मोठ्या टाऊनशिपसाठी जपानच्या शासकीय कंपनीसोबत बोलणी सुरू असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले. आपल्या कारकिर्दीत एखादा मोठा प्रकल्प व्हावा, अशी प्रत्येक मंत्र्याची इच्छा असते. त्यामुळे हा प्रकल्प झाला, तर एक वेगळा आनंद मिळणार असून, शरद पवार यांचा विकासाचा दृष्टिकोन येथे कामाला येईल, असे आव्हाड म्हणाले. अंबरनाथमध्ये ही टाऊनशिप झाली, तर ती शहराच्या विकासासाठी महत्त्वाची ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: MHADA to be set up in Ambernath The highest township in the state - Minister Jitendra Awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.