मीरा भाईंदर शहराला होणारा एमआयडीसीचा पाणी पुरवठा शुक्रवारी २४ तासांसाठी बंद  

By धीरज परब | Published: February 21, 2024 02:54 PM2024-02-21T14:54:01+5:302024-02-21T14:54:28+5:30

Mira Bhayander Water: मीरा भाईंदर शहराला होणारा एमआयडीसी चा पाणी पुरवठा शुक्रवारी २४ तासांसाठी दुरुस्तीच्या कामा मुळे बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना दोन ते तीन दिवस पाणी टंचाई सहन करावी लागणार आहे.

MIDC water supply to Mira Bhayander city shut for 24 hours on Friday | मीरा भाईंदर शहराला होणारा एमआयडीसीचा पाणी पुरवठा शुक्रवारी २४ तासांसाठी बंद  

मीरा भाईंदर शहराला होणारा एमआयडीसीचा पाणी पुरवठा शुक्रवारी २४ तासांसाठी बंद  

मीरारोड - मीरा भाईंदर शहराला होणारा एमआयडीसी चा पाणी पुरवठा शुक्रवारी २४ तासांसाठी दुरुस्तीच्या कामा मुळे बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना दोन ते तीन दिवस पाणी टंचाई सहन करावी लागणार आहे.

मीरा भाईंदर शहरास स्टेम प्राधिकरण व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम.आय.डी.सी.) प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मार्फत पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरुत्व वाहिनीचे कटाई नाका ते शीळ टाकी येथे तातडीची देखभाल व दुरुस्तीची कामे करण्याकरीता २४  तासांचा शटडाऊन घेतला जाणार आहे. 

त्यामुळे गुरुवार दि. २२ रोजी रात्री १२ वा. ते शुक्रवार दि. २३ रोजी रात्री १२ वाजेपर्यत असा २४ तासांसाठी एम.आय.डी.सी. प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. ह्या दरम्यान स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा सुरु राहणार आहे. परंतु एम.आय.डी.सी. प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा पुर्ववत होईपर्यत मीरा-भाईंदर शहरास पाणी पुरवठा कमी दाबाने व उशीराने होणार आहे.  त्यामुळे नागरीकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा व महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर यांनी केले आहे. 

Web Title: MIDC water supply to Mira Bhayander city shut for 24 hours on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.