ठाणे जिल्हा परिषदेच्या धोकादायक इमारतीतील कार्यलयांचे अन्यत्र स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 07:03 PM2019-05-04T19:03:26+5:302019-05-04T19:10:15+5:30
धोकादायक इमारत पाडून त्या जागी भव्य मोठी इमारत बांधण्याचे नियोजन जिल्हा परिषदेकडून करण्यात आले आहे. तत्पुर्वी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जुन्या वास्तुंमध्ये या कार्यालयांचे सध्यास्थितील स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार या धोकादायक इमारतीमधील अर्थ विभाग पदाधिकाऱ्यांच्या निवासी इमारतीच्या खाली तयार केलेल्या तळमजल्याच्या जागेवर थाटला जात आहे.
ठाणे : जिल्हा परिषदेची मुख्य इमारत मागील दीड वर्षांपासून धोकादायक म्हणून घोषीत करण्यात आली आहे. तसा ट्रक्चर आॅडीट रिपोर्टही प्राप्त झालेला आहे. मात्र इमारत आज, उद्या खाली करण्याचा मुहूर्त जिल्हा परिषदेच्या प्रशासनस मिळालाच नाही. अखेर पावसाळा जवळ आला, त्यात फॅनी वादळाची सुरू असलेली दहशत लक्षात घेऊन या इमारतीमधी बहुतांशी विभागांनी आता अन्यत्र स्थलांतरीत होण्यास प्रारंभ केल्याचे निदर्शनात आले आहे.
धोकादायक इमारत पाडून त्या जागी भव्य मोठी इमारत बांधण्याचे नियोजन जिल्हा परिषदेकडून करण्यात आले आहे. तत्पुर्वी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जुन्या वास्तुंमध्ये या कार्यालयांचे सध्यास्थितील स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार या धोकादायक इमारतीमधील अर्थ विभाग पदाधिकाऱ्यांच्या निवासी इमारतीच्या खाली तयार केलेल्या तळमजल्याच्या जागेवर थाटला जात आहे. ग्राम पंचायत विभाग महिला बालकल्याण विभागाच्या तळमजल्यात सुरू होईल. येथील एमआरईजीएसचे कार्यालय अन्यत्र जाणार आहे. अस्थापना विभाग आरोग्य विभागाच्या इमारतीत स्थलांतरीत होईल, तर अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे कार्यालय समाजकल्याण विभागाच्या इमारतीमध्ये तळमजल्यावर जात आहे. पदाधिकाऱ्यांच्या तळमजल्यावरील सर्व शिक्षा अभियानाचे कार्यालय, एमआरईजीएस आणि बांधकाम विभागाची इमारत व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या इमारतीत जात आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षांसह, सर्व सभापतींचे दालन त्यांच्या निवासस्थानाच्या इमारतींमध्ये थाटले जाईल. या धोकादायक इमारतीला या आधीच खाली करणे अपेक्षित होते. पण त्यास विलंब झाला. विषाची परीक्षा नको म्हणून या इमारतीमधील कार्यालये अन्यत्र शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालात सोनवणे यांनी सांगितले. या सर्व कार्यालयाना एका इमारतीत शिफ्ट करण्याच्या दृष्टीने चरई येथील एमटीएनएलच्या इमारतीमधील दोन सभागृहांची पाहाणी केली आहे. त्यांचे भाडे निश्चित करून तसा जिल्हा परिषदेचा ठराव घेतला जाईल. त्यास राज्य शासनाची मंजुरी घेऊन या एमटीएनएलच्या इमारतीमध्ये जिल्हा परिषदेची कार्यालये सुरू करण्याच्या प्रयत्न असल्याचे ही सोनवणे यांनी निदर्शनात आणून दिले आहे.