वाढत्या रुग्णांमध्ये सौम्य, मध्यम लक्षणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:15 AM2021-03-13T05:15:00+5:302021-03-13T05:15:00+5:30

कल्याण : केडीएमसी हद्दीत कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. शुक्रवारी ४१६ नवीन ...

Mild, moderate symptoms in growing patients | वाढत्या रुग्णांमध्ये सौम्य, मध्यम लक्षणे

वाढत्या रुग्णांमध्ये सौम्य, मध्यम लक्षणे

Next

कल्याण : केडीएमसी हद्दीत कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. शुक्रवारी ४१६ नवीन रुग्णांची भर पडली आहे. या रुग्णांमध्ये सौम्य आणि मध्यम स्वरूपाची कोरोनाची लक्षणे आढळली आहेत. मनपाने कोरोना चाचण्यांमध्येही वाढ केली आहे. रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी परतणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. शुक्रवारी १५२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. एकीकडे रुग्ण वाढत असले तरी कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. शुक्रवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

मागील १२ दिवसांत मनपा हद्दीत कोरोनाचे दोन हजार ९९५ नवे रुग्ण आढ‌ळले. तर, नऊ जणांचा मृत्यू झाला. डोंबिवली पूर्वेत शुक्रवारी १५५, तर कल्याण पश्चिमेत ९९ रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण ६६,१४५ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यातील १,२०९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर उपचाराअंती बरे झालेल्यांची संख्या ६२,२१६ इतकी आहे. सध्या २,७१९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या १० दिवसांत रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याने कोरोनाची दुसरी लाट आली का? अशी शंका उपस्थित होत आहे.

ज्येष्ठांवर रुग्णालयात उपचार

- जे रुग्ण आढळत आहेत त्यांच्यात सौम्य व मध्यम स्वरूपाची लक्षणे आढळून येत आहेत. मनपा हद्दीत ३२ ठिकाणी कोरोना चाचणी केंद्रे उघडल्याची माहिती केडीएमसीच्या साथरोग विभागाच्या प्रमुख डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली.

- सौम्य आणि मध्यम लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांना रुग्णालय अथवा विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. ज्येष्ठ नागरिकांना मात्र तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

------------------

Web Title: Mild, moderate symptoms in growing patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.