बाजार समितीत सेना विजयी

By admin | Published: February 17, 2017 12:12 AM2017-02-17T00:12:12+5:302017-02-17T00:12:12+5:30

कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत शिवसेनाप्रणीत महाआघाडीने एकूण १८ पैकी ११ जागा जिंकून बाजी मारली.

The military won the market committee | बाजार समितीत सेना विजयी

बाजार समितीत सेना विजयी

Next

भिवंडी : कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत शिवसेनाप्रणीत महाआघाडीने एकूण १८ पैकी ११ जागा जिंकून बाजी मारली. त्यामुळे येथे अनेक वर्षे भाजपा खासदार कपिल पाटील यांच्या एकहाती वर्चस्वाला धक्का बसला आहे.
भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. यामध्ये कृषी व बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदारसंघात एकूण ३२१ पैकी ३१७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ग्रामपंचायत मतदारसंघात ११५६ पैकी ११३२ मतदारांनी मतदान केले, तर व्यापारी व आडते मतदारसंघात ११२ पैकी १०७ मतदारांनी मतदान केले. या निवडणुकीची मतमोजणी बुधवारी भिवंडीतील राजया गाजेंगी सभागृहात झाली. ग्रामपंचायत मतदारसंघात भाजपाचे संतोष जाधव व महाआघाडीच्या सुनीता भावर तसेच कृषी व बहुउद्देशीय सहकारी संस्था या मतदारसंघात भाजपाचे दयानंद पाटील व महाआघाडीचे विष्णू पाटील, तर कृषीच्याच सर्वसाधारण जागेतील सातव्या क्रमांकासाठी महाआघाडीचे अनंता भागोजी पाटील व महाआघाडीचेच मोहन मणेरा यांना एकसमान मते मिळून भाजपाचे संतोष जाधव व दयानंद पाटील, अनंता पाटील चिठ्ठीद्वारे निवडून आले. (वार्ताहर)

Web Title: The military won the market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.