ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयावर दुग्ध शर्करा योग सप्रेम नमस्कार व नृत्यझंकार फिल्मचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 03:04 PM2018-10-23T15:04:54+5:302018-10-23T15:07:39+5:30

ब्रह्माण्ड कट्ट्यावर श्रीप्रकाश सप्रे पुणे यांचा सप्रेम नमस्कार हा एकपात्री कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शॉर्ट फिल्म "नृत्यझंकार" यांचा प्रिमियर शो संपन्न झाला. 

Milk Sugar Yoga is the start of the film and the dance shankar film on Thane Universe. | ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयावर दुग्ध शर्करा योग सप्रेम नमस्कार व नृत्यझंकार फिल्मचा शुभारंभ

ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयावर दुग्ध शर्करा योग सप्रेम नमस्कार व नृत्यझंकार फिल्मचा शुभारंभ

googlenewsNext
ठळक मुद्देब्रह्माण्ड कट्ट्यावर श्रीप्रकाश सप्रे पुणे यांचा सप्रेम नमस्कारशॉर्ट फिल्म "नृत्यझंकार" यांचा प्रिमियर शो संपन्नरसिकांचे मनोरंजन हेच ध्येय स्पष्ट असले की शरीर व मन थकत नाही

ठाणे : ब्रह्मांड कट्टयावर वेगवेगळया क्षेत्रातील कलाकारांना संधी देऊन वेगवेगळे प्रयोग सादर केले जातात. यावेळी साई सिध्दी प्रॉडक्शनची ब्रह्मांड कट्टयाच्या सहकार्याने नवी कोरी व बिग बजेट शॉर्ट फिल्म "नृत्यझंकार" यांचा प्रिमियर शो आयोजित करण्यात आला होता. साई सिध्दी प्रॉडक्शन  सिध्दी आनंद खर्डीकर हिच्या कथा व दिग्दर्शना मधून साकारलेली ही शॉर्ट फिल्म खरचं साऱ्या रसिकांच्या मनावर ठसवून गेली व यूट्यूबवर या फिल्मला एका दिवसात 1500 हजार प्रेक्षकांनी बघितली हा देखील उच्चांक केला.

ब्रह्मांड कट्टयावर मधुगंधा इंद्रजीत यांच्या नृत्यझंकार हा नृत्याच्या कार्यक्रमाच्या वेळी आनंद खर्डीकर यांनी ही फिल्म करायचे कबुल केले होते. त्या प्रमाणे दोन महिन्यात ही फिल्म तयार करण्यात आली.  कला ही किती उत्स्फुर्त असते याचे सुदंर वर्णन या शॉर्ट फिल्म मध्ये करण्यात आले आहे.  समानता गुप्ते हीची प्रमुख भुमिका व त्याला सहकलाकारांनी दिलेली उत्तम साथ यामुळे ही शॉर्ट फिल्म हीट ठरत आहे.   सिध्दी खर्डीकर ही ब्रह्मांड मधली कन्या अंत्यत छोट्या वयात हिने ही कला आमत्सात करुन लिलया पेलली हेच या फुलेम मधून दिसून आल्रंगकर्मी ब्रह्मांड कट्टयाचे आयोजक राजेश जाधव व महेश जोशी यांच्यावतीने तिला अवार्ड देऊन गौरवण्यात आले.  नृत्यझंकार या शॉर्ट फिल्मचे पोस्टर अनावरण अभिनय कट्टयावर किरण नाकती यांच्या हस्ते करण्यात आले होते.  कलेला वयाचे बंधन नसते तर नेहमीच आनंद देता येतो व घेता येतो.  या वृत्ति नुसार हरहुन्नरी रंगकर्मी हास्यसम्राट श्रीप्रकाश सप्रे पुणे यांचा सप्रेम नमस्कार हा एकपात्री कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  मुळचे पुणेकर असलेले श्रीप्रकाश सप्रे यांनी सेवानिवृत्ती नंतर सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम करण्यास सुरुवात केली.  अभिनेते शरद तळवलकर यांना अभिनय क्षेत्रातील गुरु मानत त्यांना हा छंद निष्ठेने जोपासला.  मराठी नाट्यसृष्टीतील अनेक मान्यवरांसह त्यांनी प्रायोगिक व व्यावसायिक नाटकात तसेच दूरदर्शनवर भूमिका केल्या आहेत.  नाट्य , संगीत,  गायन,  वादन,  विडंबनात्मक कविता,  नाव आडनावांतील गमंत अशा अनेक कलांचा एकत्रित आनंद त्यांनी रसिकांना आपल्या कार्यक्रमात दिला व मंत्रमुग्ध केले. वयाच्या 62 व्या वर्षी ही सलग दोन तास न थकता कला सादर करण्याची उर्मी त्यांना रसिकांच्या प्रोत्साहनातून मिळाली. रसिकांचे मनोरंजन हेच ध्येय स्पष्ट असले की शरीर व मन थकत नाही हेच विनोदवीर श्रीप्रकाश सप्रे यांच्या एकपात्री कार्यक्रमातून सिध्द झाले. पाहुण्याचे स्वागत महेश जोशी व आभार प्रदर्शन राजेश जाधव यांनी केले.

Web Title: Milk Sugar Yoga is the start of the film and the dance shankar film on Thane Universe.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.