बागेश्वर महाराज यांच्या कथेसाठी लाखोचा जनसागर लोटला!
By पंकज पाटील | Published: May 7, 2023 09:23 PM2023-05-07T21:23:01+5:302023-05-07T21:24:53+5:30
शिवमंदिरच्या परिसरात या भगव्या सोहळ्याचा आयोजन करण्यात आले असून त्यासाठी जयत तयारी देखील करण्यात आली होती.
अंबरनाथ: अंबरनाथमध्ये बागेश्वर महाराज यांच्यासाठी लाखोच्या संख्येने भाविक अंबरनाथ नगरीमध्ये आले होते. हनुमान चालिसावर त्यांनी कथा सादर केली. आदल्या दिवशी रात्रीपासून शिव मंदिराच्या परिसरात जागा अडवण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने आले होते. दरम्यान, सात मे ते नऊ मे या कालावधीत ईश्वर महाराज यांच्या कथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शिवमंदिरच्या परिसरात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी जयत तयारी देखील करण्यात आली होती. लाखोच्या संख्येने भाविक कथा ऐकण्यासाठी येणार असल्याने त्या ठिकाणी चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पहिल्याच दिवशी लाखोच्या संख्येने भाविक शिव मंदिराच्या प्रांगणात उपस्थित होते. बागेश्वर महाराज यांची एक झलक पाहण्यासाठी भाविक आतुर झाले होते. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी शिवमंदिराकडे जाणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते.
महाराजांना नोटीस
बागेश्वर महाराज यांना पोलिसांनी नोटीस बजावली. महाराष्ट्रातील संत व महापुरुषांचा अपमान होणार नाही, कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणार नाहीत, चमत्कारांचे दावे होणार नाहीत, दोन धर्मात तेढ निर्माण होणार नाही, अंधश्रद्धेचा प्रसार होणार नाही या सर्व गोष्टींची काळजी घेण्याची सूचना नोटीसमध्ये करण्यात आली.