दारू, रोकडसह आतापर्यंत लाखोंचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:30 PM2019-04-27T23:30:32+5:302019-04-27T23:31:01+5:30
मतांचा बाजार रोखण्यासाठी अधिकाऱ्यांची निवडणुकीवर करडी नजर
ठाणे/कल्याण : ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये १० मार्च ते २३ एप्रिलदरम्यान आचारसंहिता पथकांनी ४३ लाख ८८० इतकी रोकड, नऊ लाख १८ हजारांची दारू, तर हातभट्टी चालवणाऱ्यांकडून २० लाखांच्या १५ वाहनांसह इतर सामग्री असा २९ लाख २६ हजारांचा मुद्देमाल, एक गावठी रिव्हॉल्व्हर, आठ सुरे असा ७२ लाख ३२ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच कल्याणमध्येही कारवाईत लाखोंचा ऐवज जप्त केला.
2019 एकूण कारवाई
20 लाखांची वाहने
55.50 लाखांची रोकड
125470 रुपयांची हत्यारे
21.50 लाखांची दारू
ठाणे मतदारसंघात निवडणुकीवर लक्ष ठेवून असलेल्या चार अधिकाऱ्यांनी आतापर्यंत ११ ठिकाणी कारवाई केली आहे.
कल्याण परिमंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या आठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत केलेल्या कारवाईत चार गावठी कट्टे, काडतुसे हस्तगत केली आहेत. ४८ जणांना जिल्ह्यातून तडीपार केले आहे, तर १२०० च्या आसपास व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. १२ लाख ५० हजारांची रोकड जप्त केली आहे. तसेच १३५ दारूच्या गुन्ह्यांमध्ये १२ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.