लाखोंचा गंडा घालणाऱ्याला अटक

By admin | Published: October 16, 2015 01:50 AM2015-10-16T01:50:35+5:302015-10-16T01:50:35+5:30

जव्हार तसेच विक्रमगड तालुक्यांतील दुर्गम भागातील सुशिक्षित बेरोजगार आदिवासी मुलांना एसटी महामंडळात कंडक्टरची नोकरी लावून देतो

Millions of people stabbed and arrested | लाखोंचा गंडा घालणाऱ्याला अटक

लाखोंचा गंडा घालणाऱ्याला अटक

Next

जव्हार : जव्हार तसेच विक्रमगड तालुक्यांतील दुर्गम भागातील सुशिक्षित बेरोजगार आदिवासी मुलांना एसटी महामंडळात कंडक्टरची नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणारा आरोपी जव्हार तालुक्यातील धाडसी तरुणीच्या प्रसंगावधानामुळे गजाआड झाला.
नीलम नारायण वातास (२१), रा. उंबरविहीर, ता. जव्हार या मजुरी करणाऱ्या १२ वी उत्तीर्ण तरुणीस जितेश प्रकाश पोटिंदा, रा. खंबाळा, पसोडीपाडा याने डिसेंबर २०१४ मध्ये पनवेल येथे एसटी महामंडळात कंडक्टरची नोकरी लावून देतो. माझी तिथे चांगली ओळख आहे, असे सांगून साध्या कागदावरची नोकरभरतीची जाहिरात दाखवली. परंतु, त्यासाठी साहेबांना ७०००० द्यावे लागतील, असे सांगितले. जितेश हा ओळखीचा असल्याने नीलम हिने मामा रामदास वातास तसेच इतर नातेवाइकांकडून उधारीवर पैसे घेऊन जमेल तसे फेब्रुवारी २०१५ पर्यंत जितेशला ७०००० रुपये दिले.
त्यानंतर, जितेश याने नीलमची मूळ प्रमाणपत्रे घेऊन पनवेल एसटी स्थानक गाठले. नीलमला तिथेच थांबवून मूळ प्रमाणपत्रे साहेबांना दाखवण्याच्या बहाण्याने जितेश गेला आणि आल्यावर रा.प. आगार व्यवस्थापक डी.वाय. शिर्के यांच्या सही व शिक्क्याचे पत्र दिले. सप्टेंबर महिन्यात नीलमला मुलाखतीसाठी विभाग कार्यालयात हजर राहण्याचे पत्राद्वारे कळविण्यात आले. या मुलाखतीला जाण्याआधी नीलमने जितेश यास फोन केला असता पावसामुळे मुलाखती रद्द झाल्याचे त्याने सांगितले. याचा संशय आल्याने नीलम २२ तारखेला पनवेल एसटी आगरात पोहोचली. आगार व्यवस्थापक शिरसाट यांना सदरचे पत्र दाखविले असता शिरसाट यांनी या आगारात शिर्के नावाचे कोणी अधिकारी नसून अशा मुलाखती मुंबई कार्यालयातच होतात. हे पत्रदेखील बनावट असून तिला फसविल्याचे सांगितले. याचा नीलम हिला मानसिक धक्का बसला. तिने मामा यशवंत यांना घडलेली घटना सांगितल्यानंतर त्यांनी जितेशचा बराच शोध घेतला. त्याचा शोध न लागल्याने १३ तारखेला नीलमने रीतसर फिर्याद दाखल केली. पोलिसांनी आरोपी जितेश यास अटक केल्यानंतर त्याने असेच आमिष दाखवून जितेंद्र विश्राम बुधर, रा. वावर रु. ३५०००, प्रताप गंगा सुतार रा. पिम्पुर्ना रु. ३५०००, अभिमन्यू भिवा भोये रा. कायरी रु. ३५००० सर्व जव्हार तालुका, तर विक्रमगड तालुक्यातील अंधेरी येथील विनेश लक्ष्मण जाधव यांच्याकडून रु. ५०००० घेतल्याची बाब समोर आली. ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनी नजीकच्या पोलिसांशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन पो.नि. नाईक यांनी केले आहे. जितेशला १९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पो.उप.नि. बुधर व पोलीस पथक करीत आहे.

Web Title: Millions of people stabbed and arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.