बोईसर परिसरातील निकाल शंभरीकडे
By Admin | Published: May 31, 2017 05:26 AM2017-05-31T05:26:34+5:302017-05-31T05:26:34+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परिक्षेचा जाहिर झालेल्या आॅनलाइन
लोकमत न्यूज नेटवर्क
बोईसर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परिक्षेचा जाहिर झालेल्या आॅनलाइन निकालात बोईसर व परिसरातील कॉलेजचा निकाल १०० टक्के च्या आसपास लागला आहे.
बोईसर पूर्वे कडील ग्रामीण विभाग श्रिमक शिक्षण संस्था (लालोंडे) स्व. सौ. विद्या विनोद अधिकारी माध्यमिक विद्यालयाच्या स्व.श्रीमती गोदावरी पा. अधिकारी वाणिज्य शाखेचा १०० टक्के निकाल लागून मनोज भुतकडे हा विद्यार्थी ८१.३८ गूण मिळवून प्रथम आला आहे तर द्वितीय निलम राजपूत (७९.८५टक्के) तर तृतीय आक्षंका भुतकडे (७८.४६टक्के) आली आहे.
स्व.सौ. कामिनी द. अधिकारी कला शाखेचा निकाल ९७.८७टक्के लागला असून वंदना भोईर ही विद्यार्थिनी ७८.४६ टक्के गूण मिळवून प्रथम तर अजय धापशी (७६.६२ टक्के) द्वितीय , कुणाल शेलार (७५.८४ टक्के) तृतीय आला आहे. तर श्रीमति मंजु. म. अग्रवाल सायन्स कनिष्ठ महाविद्यालयाचा सायन्स शाखेचा निकाल ९७.५९ टक्के लागला असून आदेश ठाकूर ९७.६९ टक्के गूण मिळवून प्रथम, विराज घरत ( ६६.९२ टक्के) द्वितीय तर ऋ षिकेश रांजणे (६६ टक्के) हा विद्यार्थी तृतीय आला आहे. तारापुर विद्यामंदिर जूनियर कॉलेज सायन्स शाखेचा निकाल ९८.९१ टक्के लागला असून सुहानी घोरपडे ही विद्यार्थिनी ९३.६९ गूण मिळवून प्रथम , ऋतुजा पाटील (८८.९२) द्वितीय तर गणेश शेणाय (८८.६२) तृतीय आला आहे. तर याच कॉलेजचा वाणिज्य शाखेचा निकाल ९६.६८ लागला असून अमन वशिष्ठ ९२.१५ गूण मिळवून प्रथम, पूजा चव्हाण (८९.०८) द्वितीय, तर अंकिता राऊत (८७.८५ ) तृतीय आली आहे
बोईसर मिलिटरी स्कूल अँड ज्यूनियर कॉलेजच्या वाणिज्य शाखेचा निकाल ९८.२७ लागला असून राठोड मुमल कुवर ८९.८४ गूण मिळवून प्रथम, अंशिका सिंग (८६.९२) द्वितीय तर कनीज मेमन (८५.०७) ही विद्यार्थीनी कॉलेज मध्ये तृतीय आली आहे.