मीरा भाईंदरमध्ये सेल्फी पॉईंटच्या बांधकामांवर महापालिकेची लाखोंची उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2021 06:03 PM2021-10-28T18:03:51+5:302021-10-30T17:33:55+5:30

रस्ते व पदपथ वर कोणत्याही स्वरूपाची बांधकामे करता येत नाहीत.

Millions squandered on construction of Selfie Point in Mira Bhayandar | मीरा भाईंदरमध्ये सेल्फी पॉईंटच्या बांधकामांवर महापालिकेची लाखोंची उधळपट्टी

मीरा भाईंदरमध्ये सेल्फी पॉईंटच्या बांधकामांवर महापालिकेची लाखोंची उधळपट्टी

Next

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या मनमानी व उधळपट्टी कारभाराने अनेक समस्या रहात आल्या आहेत . आता तर आधीच रस्ते अरुंद असताना त्या रस्त्यांवर चक्क सेल्फी पॉईंटच्या नावाखाली नियमांचे उल्लंघन करून महापालिकाचा सर्वत्र मनमानीपणे बांधकाम करत सुटली आहे . रहदारीला अडथळा ठरणाऱ्या ह्या सेल्फी पॉईंटच्या बांधकामांवर लाखोंची उधळपट्टी चालली असून हि बांधकामे पाडा अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

रस्ते व पदपथ वर कोणत्याही स्वरूपाची बांधकामे करता येत नाहीत. न्यायालयाचे देखील तसे आदेश असून मीरारोडच्या विजय पार्क भागातील रस्त्यावर पोलीस चौकीचे नगरसेवक व पालिका निधीचे बांधकाम देखील न्यायालयात प्रदीप जंगम यांनी केलेल्या याचिके नंतर रद्द करण्याची नामुष्की पालिकेवर आली होती. परंतु तरी देखील काही नेते  व नगरसेवक आणि पालिका प्रशासन सुधारायचे नाव घेत नाहीत . मुळातच शहरातील रस्ते,या नाके व पदपथ अतिक्रमणाने व्यापलेले आहेत . लोकांना चालायला जागा नाही तर वाहतुकीची प्रचंड कोंडी नित्याची झाली आहे . जाहिरात फलक नियंत्रण अधिनियमा नुसार मनाई असताना देखील महापालिकेने ठेकेदारांच्या फायद्यासाठी पदपथ व रस्त्यांवर होर्डिंग उभारून दिले आहेत. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देणाऱ्या पालिकेने दुसरीकडे भाईंदर पूर्व रेल्वे स्थानक बाहेरील रस्ता हा विकास आराखड्या नुसार रुंद झाला नसताना येथे पालिकेने चक्क रस्त्यातच सुअभिकरणाचे काही कोटीचे बांधकाम चालवले आहे . भाईंदर पश्चिमेला देखील तसेच काम सुरु आहे .

भाईंदर फाटक येथील रस्त्यावर दोन्ही बाजूला पुतळे उभारून रस्ताच जवळपास नष्ट करून टाकला आहे. त्यातच आता काही नगरसेवकांचे चमकोगिरीचे लाड पुरवण्यासाठी शहरात रस्ता, नाके व पदपथवर  चक्क सेल्फी पॉईंटच्या नावाखाली बांधकामे चालवली आहेत . या बांधकामां साठी सर्रास नगरसेवक, प्रभाग समिती आदी निधीचा वापर करून उधळपट्टी चालवली आहे . 

आधीच रस्ते व पदपथ अरुंद असून वाढत्या लोकसंख्या व वाहनां मुळे चालायला जागा नसते. वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असते. तो त्रास कमी म्हणून की काय आता काही नगरसेवकांच्या चमकोगिरीच्या हव्यासाला पालिका प्रशासनाने खतपाणी घालत नियमबाह्यपणे भर रस्ता, पदपथ व नाक्यांवर सेल्फी पॉईंटची बांधकामे चालवली आहेत. 

ह्या बांधकामां मुळे आधीच अरुंद असलेले रस्ते - नाके व पदपथचा कोंडमारा झाला आहे. नागरिकांच्या त्रासात व वाहतूक कोंडीत मोठी भर पडली आहे. सेल्फी पॉईंट वर गर्दी जमल्यास ताप वाढून अपघात आणि भांडणे वाढण्याची शक्यता आहे. मुळात रहदारी व वर्दळीच्या ठिकाणी रस्ता - पदपथ वर सेल्फी पॉइंटच्या बांधकामांसाठी वाहतूक पोलिसांनी देखील परवानग्या दिल्या की नाही ? पोलिसांनी सदर कामे रोखली का नाही ? असे प्रश्न केले जात आहेत. 

सदर कामां बाबत तक्रारी आल्या असून आपल्या कार्यकाळात या कामाना मंजुरी दिलेली नाही. आयुक्तां कडे कामे रद्द करण्यास प्रस्ताव देऊ. दीपक खांबीत ( कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग ) 

आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी स्थिती महापालिकेची आणि नगरसेवकांची आहे. लोकांना चालायला जागा नाही आणि प्रचंड वाहतूक कोंडी असताना नगरसेवक व पालिकेला हे असले प्रकार करण्याची लाज कशी वाटत नाही ? रस्ते - पदपथ वरील सर्व सेल्फी पॉईंट तोडून गुन्हे दाखल झाले पाहिजेत. खर्च नगरसेवक - अधिकारी यांच्या कडून वसूल करा. जनतेच्या घामाचा पैसा आहे यांच्या घरचा नाही. प्रमोद देठे ( नागरिक ) 

Web Title: Millions squandered on construction of Selfie Point in Mira Bhayandar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.