‘एमआयएम’चा फटका युतीला

By admin | Published: July 16, 2016 01:52 AM2016-07-16T01:52:14+5:302016-07-16T01:52:14+5:30

आयकर विवरणपत्राची व लेखा परीक्षण लेख्याची प्रत सादर न केल्याने निवडणुक आयोगाने ओवैसी बंधूंच्या आॅल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाची नोंदणी रद्द केली आहे

The 'MIM' strike | ‘एमआयएम’चा फटका युतीला

‘एमआयएम’चा फटका युतीला

Next

ठाणे : आयकर विवरणपत्राची व लेखा परीक्षण लेख्याची प्रत सादर न केल्याने निवडणुक आयोगाने ओवैसी बंधूंच्या आॅल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाची नोंदणी रद्द केली आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेत एमआयएमच्या आड मतांची गोळा बेरीज जुळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेना, भाजपला याचा मोठा फटका बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. तर दुसरीकडे याचा फायदा उठविण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादीने मुस्लिमबहुल वस्तीत पुन्हा मोर्चे बांधणी सुरु केली आहे.
एमआयएम ठाण्यातील काही मुस्लिमबहुल वस्तीत चमत्कार घडवू शकतो अशी चर्चा होती. त्यानुसार कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या अनेक महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी या पक्षात जाहीर प्रवेशही केला होता. मुंब्य्रात तर या पक्षाचा चांगलाच बोलबाला सुरु झाला होता. तसेच, समाजवादीमधील देखील काही महत्वाची मंडळी या पक्षाच्या संपर्कात होती. एमआयएमच्या या वाढत्या जोरावरच मुब्ंय्रात शिवसेनेने अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली होती. एमआयएम हे भाजपाचेच पिल्लु असल्याची चर्चाही रंगली होती.
एमआयएम रिंगणात नसल्याचा फटका बसेल ही बाब शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांनीही मान्य केली आहे. ही नोंदणी रद्द केल्याचा फायदा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीलाच अधिक होईल असा त्यांचा दावा आहे. एमआयएम हे भाजपाचे पिल्लू असल्याची बाब मात्र त्यांनी अमान्य केली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर भाजपा सहानभुती मिळविण्यासाठी एमआयएमची मान्यता पुन्हा मिळवून देईल, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. तर कॉंग्रेसने देखील भाजपावर याच मुद्यावरुन आगपाखड केली आहे.

Web Title: The 'MIM' strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.