२७ गाव कर्मचा-यांना मिळणार किमान वेतन, महासभेत प्रस्ताव, वर्षाला ९ कोटी १३ लाखांचा बोजा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 06:21 AM2017-09-13T06:21:14+5:302017-09-13T06:21:14+5:30

Minimum wages to be given to 27 village employees, proposals in the General Assembly, burden of 9 crores 13 lakhs annually | २७ गाव कर्मचा-यांना मिळणार किमान वेतन, महासभेत प्रस्ताव, वर्षाला ९ कोटी १३ लाखांचा बोजा  

२७ गाव कर्मचा-यांना मिळणार किमान वेतन, महासभेत प्रस्ताव, वर्षाला ९ कोटी १३ लाखांचा बोजा  

Next

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेत समावेश झालेल्या २७ गावांतील कर्मचा-यांना किमान वेतन मिळावे ही मागणी अंमलात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिका प्रशासनाकडून यासंदर्भातला प्रस्ताव बुधवारी पार पडणाºया महासभेत दाखल करण्यात आला आहे. ४९४ कर्मचा-यांना या निर्णयाचा लाभ होणार असून महापालिकेच्या तिजोरीवर वर्षाकाठी ९ कोटी १३ लाख ८६ हजार २४० रूपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे.
दि. १ जून २०१५ रोजी २७ गावांचा केडीएमसीत पुन्हा समावेश करण्यात आला. येथील कर्मचाºयांना प्रथम ६ महिन्यांच्या कालावधीसाठी महापालिकेच्या सेवेत रूजू करून घेण्यात आले. त्यानंतर वेळोवेळी त्यांना मुदतवाढ देण्यात आली. कायद्यानुसार त्यांना किमान वेतन मिळावे ही मागणी स्थानिक लोक प्रतिनिधींकडून वारंवार होत होती. कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांनी अलीकडेच आयुक्त पी. वेलरासू यांची भेट घेऊन किमान वेतनाच्या मुद्याकडे लक्ष वेधले होते. तेव्हा २७ गावातील ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असणाºया आणि आता महानगरपालिकेच्या सेवेत दाखल झालेल्या कर्मचाºयांना शासन निर्णयानुसार देय असणारे किमान वेतन लागू होणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. महापालिका प्रशासनाने यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याकरिता बुधवारी होणाºया महासभेत प्रस्ताव दाखल केला आहे.
या निर्णयाचा लाभ मिळणाºया ४९९ कर्मचाºयांपैकी ४ जण हे किमान वेतनापेक्षा जास्त वेतन असलेले असून १ कर्मचारी मृत झालेला आहे. त्यामुळे किमान वेतन देय असलेल्या कर्मचाºयांची संख्या ४९४ इतकी आहे. त्यांची प्रभाग निहाय आकडेवारी पाहता ‘आय’ प्रभागक्षेत्रात २२७ तर ‘ई’प्रभागात २६७ कर्मचारी आहेत. यात १५८ कुशल, अर्धकुशल १२ तसेच ३२४ कर्मचारी हे अकुशल आहेत. २७ गावांमध्ये ग्रामपंचायतींची संख्या २६ इतकी होती. परंतु गावांची संख्या २७ आहे. भोपर आणि देसलेपाडा या दोन गावांची एकच ग्रामपंचायत होती. ज्या कर्मचाºयांना किमान वेतन देय आहे त्यांना ३ हजार ८० इतका विशेष भत्ता लागू आहे.

मोजावे लागणार ७६ लाख १५ हजार ५२०

किमान वेतनाप्रमाणे आता कुशल कर्मचाºयांना १७ हजार ८० रूपये, अर्धकुशल कर्मचाºयांना १६ हजार ८० तर अकुशल कर्मचाºयांना १४ हजार ५८० रूपये वेतन मिळणार आहे. कुशल कर्मचाºयांवर महिन्याकाठी २६ लाख ९८ हजार ६४०, अर्धकुशल कर्मचाºयांसाठी १ लाख ९२ हजार ९६० तसेच अकुशल कर्मचाºयांवर ४७ लाख २३ हजार ९२० रूपये असे एकूण ७६ लाख १५ हजार ५२० रूपये खर्च होणार आहेत.

Web Title: Minimum wages to be given to 27 village employees, proposals in the General Assembly, burden of 9 crores 13 lakhs annually

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.