मंत्री दादा भुसे यांनी घेतली जखमींची भेट
By नितीन पंडित | Published: July 18, 2023 08:20 PM2023-07-18T20:20:47+5:302023-07-18T20:21:23+5:30
या वेळी त्यांच्या सोबत तहसीलदार अधिक पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते.
भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा खडवली नाका येथील भीषण अपघातात जखमी झालेल्या पाच जणांवर भिवंडीतील वंजारपट्टी नाका येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या जखमींची भेट सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम ) मंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी घेतली.यावेळी भुसे यांनी जखमींची विचारपूस केली व डॉक्टरांना योग्य ते उपचार करण्याच्या सूचना दिल्या. या वेळी त्यांच्या सोबत तहसीलदार अधिक पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते.
मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी ठाणे बायपास रस्त्याचे आठ पदरी करणाचे काम सुरू असून या कामाच्या पाहणी सोबत या मार्गावर होणाऱ्या वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी मंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी पाहणी दौरा आयोजित केला होता.खारीगाव टोल नाका ते वडपे या दरम्यानच्या रस्त्याचे व तेथील सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची त्यांनी यावेळी पाहणी केली.त्यांनतर त्यांनी भिवंडीतील अपघातातील जखमींना भेट दिली.