महापालिकेचे टेंडर निघेल तेव्हा निघेल वाहतळात रिक्षा थांबवा - राज्यमंत्री रवींद्र चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 07:36 PM2018-04-09T19:36:29+5:302018-04-09T19:36:29+5:30

पाटकर रोडवरील नाका कामगारांची गर्दी सकाळी 9.30 नंतर नसते. त्यामुळे केळकर रोडवरील रिक्षा पाटकर रोडवर हलवाव्यात असेही नीर्देश त्यांनी वाहतूक विभागाला दिले.

Minister of State Ravindra Chavan - Stop the rickshaw while traveling from the municipal tender | महापालिकेचे टेंडर निघेल तेव्हा निघेल वाहतळात रिक्षा थांबवा - राज्यमंत्री रवींद्र चव्हाण

महापालिकेचे टेंडर निघेल तेव्हा निघेल वाहतळात रिक्षा थांबवा - राज्यमंत्री रवींद्र चव्हाण

Next

डोंबिवली: रेल्वे स्टेशन परिसरात होणा-या वाहतूक कोंडीमध्ये अस्ताव्यस्त असलेल्या रिक्षा, कशाही पद्धतीने उभ्या राहणा-या परिवहनच्या बसेस यामुळे अडथळे येत आहेत. विशेषत: केळकर रोड, पाटकर रोड आणि चिमणी गल्लीतील रिक्षा चालक यांमुळे समस्यांमध्ये वाढ होत असल्याचे नीदर्शनास आले आहे. रिक्षा चालकांची मुजोरी तात्काळ मोडीत काढा. तसेच चिमणी गल्लीतील पाटकर प्लाझा मध्ये असलेले महापालिकेच्या वाहनतळामध्ये रिक्षा उभ्या कराव्यात, जेणोकरुन रस्ता मोकळा होईल, नागरिकांना दिलासा मिळेल असे नीर्देश राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले.

चव्हाण यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती राहुल दामले यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, वाहतूक विभागाचे अधिकारी, रामनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्यासमवेत बाजीप्रभु चौक, पाटकर रोड, केळकर रोड आदी ठिकाणचा सोमवारी पाहणी दौरा केला. सातत्याने नागरिकांच्या तक्रारी येत असून त्याबद्दल जर काहीच कारवाई करायची नसेल तर या पदांवर राहू नका, बदल्या करुन घ्या असेही  चव्हाण यांनी खडसावले. रिक्षा चालकांची मुजोरी कशाला खपवून घेता, कोणावर कारवाई करु नका यासाठी मी कधी फोन केलाय का? असा सवाल त्यांनी वाहतूक अधिका-यांना केला. त्यामुळे जर कोणी कोणाचे नाव वापरुन दबाव आणत असेल तर आणखी कठोर कारवाई करण्यासाठी अधिकारी धजावतात का? असा सवालही त्यांनी केला. 

वाहनतळ सुरु करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी जर तीन वेळा टेंडर रिकॉल करत असतील तर ती शोकांतिका आहे. त्यामुळे नागरिकांची सोय बघायची की केवळ पैसा कसा मिळेल हे बघायचे असा सवाल त्यांनी महापालिका अधिका-यांना केला. तसेच दामलेंनाही तातडीने सुधारणा होते की नाही याकडे लक्ष द्या असे सांगितले. दर पाच दिवसांनी केलेल्या बदलांचा अहवाल द्या, पंधरवडय़ात कामे व्हायला हवीत, बदल दिसायलाच हवा असेही ते म्हणाले.

पाटकर रोडवरील नाका कामगारांची गर्दी सकाळी 9.30 नंतर नसते. त्यामुळे केळकर रोडवरील रिक्षा पाटकर रोडवर हलवाव्यात असेही नीर्देश त्यांनी वाहतूक विभागाला दिले.

बाजीप्रभु चौकात परिवहनचा बस स्टँड आहे. पण त्या ठिकाणी अनावश्यक बसेस उभ्या असतात. यापुढे अनावश्यक बसेस उभ्या राहणार नाहीत, ज्या बस येतील त्या विसाव्यासाठी नेहरु रोडवरील बागेजवळ उभ्या राहतील. जसजसा राऊंड असेल तशा बसेस निघतील. थांब्यावर जातील, नाहक गर्दी राहणार नाही याचीही दखल तातडीने घ्यावी आणि बदल करावेत असेही नीर्देश त्यांनी दिले.

महावितरणचीही अनेक कामे इंदीरा गांधी चौक, केळकर रोड आदी परिसरात सुरु आहेत. ती तातडीने मार्गी लावणो, पंधरवडय़ात त्यासाठी शटडाऊन घेणो, आणि अल्पावधीत कामे करुन घेणो. त्यासाठी आधी शटडाऊनची माहिती नागरिकांना देणो. तसेच नागरिकांची पाण्याची गैरसोय होणार नाही अशा वेळेत, दिवस निवडून वीजपुरवठा खंडीत करावा असेही नीर्देश महावितरणच्या अधिका-यांना त्यांनी दिले.

इंदिरा गांधी चौकात रस्त्यावर जो चढ उतारपणा आहे तो योग्य नाही, त्याचे लेव्हलींग तातडीने करणो. जेणोकरुन वाहतूकीला अडथळा येणार नाही, अपघात होणार नाहीत याचीही दखल घेऊन तात्काळ सुधारणा कराव्यात असेही नीर्देश त्यांनी दामलेंना दिले. 

Web Title: Minister of State Ravindra Chavan - Stop the rickshaw while traveling from the municipal tender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.