कल्याणमध्ये अल्पवयीन मुलेही उतरली प्रचारात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 11:59 PM2019-10-18T23:59:46+5:302019-10-18T23:59:58+5:30

१०० रुपये रोज : कामगार नाके पडले ओस

Minors also came down in the election campaign | कल्याणमध्ये अल्पवयीन मुलेही उतरली प्रचारात

कल्याणमध्ये अल्पवयीन मुलेही उतरली प्रचारात

Next

चिकणघर : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. विविध राजकीय पक्षांच्या रॅलीमध्ये नाका कामगार गुंतल्याने कल्याणमधील कामगार नाके मागील आठवड्यापासून ओस पडू लागले आहेत. किरकोळ कामासाठीही नाक्यावर मजूर मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे कल्याणमधील बांधकामांवरही परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे, प्रचारात अल्पवयीन मुलेही दिसत असून, त्यांना दिवसाला १०० रुपये रोज दिला जात आहे.
२१ आॅक्टोबरला मतदान असल्याने शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी रॅलींवर भर दिला आहे. त्यासाठी लागणारी माणसे चक्क कामगार नाक्यावरून आणली जात आहेत. महिलांना ३०० आणि पुरु षांना ५००, तर अल्पवयीन मुलांना १०० रु पये दिले जात आहेत. त्याचबरोबर त्यांना सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि सायंकाळीही जेवणाचे पाकीट दिले जात आहे.
काही उमेदवारांनी तर अंतिम यादी जाहीर झाल्यापासून प्रचाराच्या १२ दिवसांसाठी मजूर आधीच बुक करून ठेवले आहेत. सकाळी आणि सायंकाळी उमेदवाराबरोबरच प्रचार करणे आणि इतर वेळी कार्यकर्त्यांबरोबर गर्दी करण्यासाठी घरोघरी फिरणे, यासाठी ३०० ते ५०० रु पये मिळत आहेत.
शिवाय, दिवसभरात सकाळ, दुपार आणि सायंकाळी, अशा तिन्ही वेळा जेवणाचीही व्यवस्था होत असल्यामुळे मजूर नाक्यावर न जाता थेट उमेदवार सांगेल तेथे अथवा त्याच्या कार्यालयात हजर होतात. यामुळे प्रचार संपेपर्यंत तरी कामगार नाके पुन्हा मजुरांनी गजबजणार नाहीत.
नाक्यावर रोज काम मिळत नाही. कधीकधी परत जावे लागते. पण, निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यापासून रोज कुठेना कुठे प्रचारात फिरायचे काम मिळत आहे. पैसेही मिळतात आणि जेवणही मिळते. आम्हाला पक्षापेक्षा केवळ मजुरी महत्त्वाची आहे.
- विजय वाघमारे, दत्तू पवार

निवडणुकीआधीच आमच्याशी माणसांसाठी संपर्क केला जातो. ज्याच्यात्याच्या मागणीप्रमाणे आम्ही मजूर पुरवतो. यावेळी काही ठिकाणी १००, २०० अशी एकगठ्ठा मजुरांची मागणी होती.
- नानासाहेब सोमवंशी, मजूर कंत्राटदार, कल्याण

Web Title: Minors also came down in the election campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.