एका नेत्याची मर्जी राखत मीरा-भार्इंदर पालिका अधिका-यांच्या बदल्या ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 10:01 PM2018-08-31T22:01:19+5:302018-08-31T22:01:30+5:30

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या प्रमुख अधिका-यांच्या बदल्या आयुक्त बालाजी खतगावकर यांनी केल्या आहेत.

Mira-Bhahindar Palika Officers changed the favor of a leader? | एका नेत्याची मर्जी राखत मीरा-भार्इंदर पालिका अधिका-यांच्या बदल्या ?

एका नेत्याची मर्जी राखत मीरा-भार्इंदर पालिका अधिका-यांच्या बदल्या ?

Next

मीरा रोड - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या प्रमुख अधिका-यांच्या बदल्या आयुक्त बालाजी खतगावकर यांनी केल्या आहेत. तर एका आदेशात एका नेत्याची मर्जी जपत बदल्या झाल्याची चर्चा आहे. एका नेत्याची खप्पामर्जी झाल्याने पालिका सेवेतून बाहेर ठेवलेल्या दादासाहेब खेत्रे यांना त्याच नेत्याच्या मर्जीनंतर पुन्हा सेवेत रुजू करून घेत आता महत्त्वाच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण प्रमुख पदासह जाहिरात विभाग दिला आहे. खेत्रेंकडे परवाना व वाहन विभाग होता. त्या पदावर असलेले संजय दोंदे यांना भार्इंदर पूर्वेच्या प्रभाग समिती ३ चे प्रभाग अधिकारी नियुक्त केले असून, सोबत परवाना विभाग दिलाय.

प्रभाग अधिकारी असलेले गोविंद परब यांना भार्इंदर पश्चिमेच्या प्रभाग समिती २मध्ये नेमले आहे. परब हे कामगार सेनेत असल्याने व त्या नेत्याशी संबंधित बांधकामांच्या तक्रारींवर कारवाई करण्यास घेतल्याने त्यांची उचलबांगडी झाल्याची चर्चा आहे. तर दोंदे हे त्या नेत्याच्या मर्जीतले मानले जातात.

मीरा रोडच्या प्रभाग ५ चे प्रभाग अधिकारी नरेंद्र चव्हाण यांना प्रभाग समिती ४ मध्ये सुनील यादव यांच्या जागी नेमले आहे. तर यादव यांना बाजार फी वसुली व अभिलेख विभागात पाठवले आहे. प्रभाग समिती १ चे प्रभाग अधिकारी सुदाम गोडसे यांना मीरा रोडच्या प्रभाग समिती ५ मध्ये नियुक्त केले असले तरी गोडसे रजेवर असल्यानेच समिती १ चा पदभार परब यांनी तर समिती ५ चा पदभार चंद्रकांत बोरसे यांनी सांभाळायचे आदेश आहेत. प्रभाग समिती २ चे जगदिश भोपतराव यांना वाहन व पे अँड पार्कमध्ये नेमले आहे. आस्थापना अधीक्षक प्रकाश कुलकर्णी यांच्याकडे परिवहन उपव्यवस्थापकाचा अतिरिक्त पदभार सोपवला आहे. विजयकुमार म्हसाळ ( उपायुक्त मुख्यालय ) - आयुक्तांच्या आदेशानुसारच बदल्या केल्या असून यात राजकीय हस्तक्षेप नसतो. पालिकेचे काम प्रभावीपणे करण्यासाठी आवश्यकतेनुसार बदल्या केल्या आहेत.

Web Title: Mira-Bhahindar Palika Officers changed the favor of a leader?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.