मीरा-भार्इंदर महापालिकेने गेल्या सहा वर्षांत ९ हजारांहून अधिक केली वृक्षतोड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2017 06:28 PM2017-10-19T18:28:26+5:302017-10-19T18:29:11+5:30

मीरा-भार्इंदर महापालिकेने गेल्या सहा वर्षांत सार्वजनिक विकासाआड येणारी व खासगी विकासाला बाधा ठरणारी सुमारे ९ हजार ३०० हून अधिक झाडे तोडली.

Mira-Bhairinder Municipal Corporation has done more than 9000 trees in last six years | मीरा-भार्इंदर महापालिकेने गेल्या सहा वर्षांत ९ हजारांहून अधिक केली वृक्षतोड

मीरा-भार्इंदर महापालिकेने गेल्या सहा वर्षांत ९ हजारांहून अधिक केली वृक्षतोड

Next

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने गेल्या सहा वर्षांत सार्वजनिक विकासाआड येणारी व खासगी विकासाला बाधा ठरणारी सुमारे ९ हजार ३०० हून अधिक झाडे तोडली. या बदल्यात पालिकेने विविध प्रकारची सुमारे ४ हजार ११८ झाडांचीच लागवड केल्याचे आरटीआय कार्यकर्ता कृष्णा गुप्ता यांनी माहिती अधिकारातून उजेडात आणले आहे. मात्र यात राज्य सरकारच्या वनमहोत्सव दरम्यान पालिकेने नेमकी किती झाडे लावली, ते मात्र प्रशासनाकडून गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.

पालिकेकडून रस्ता रुंदीकरणासह विविध विकासाआड येणारी झाडे तोडल्याचे अनेकदा समोर आले आहे. तर खासगी विकासात बाधा ठरणारी झाडे देखील पालिकेच्या दुर्लक्षामुळे बिनदिक्कत तोडण्यात आली आहेत. हा बेकायदेशीर प्रकार अनेकदा समोर आला असला तरी ती झाडे तोडणा-यांवर अद्याप गुन्हे नोंदविण्यात आलेले नाहीत. तीन वर्षांपूर्वी पालिकेने बाधित वृक्षाला समूळ बाहेर काढून त्याचे इतरत्र पुनर्रोपण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कार्यवाहीला देखील सुरुवात झाली होती. क्रेनच्या सहाय्याने झाडे समूळ उखडून त्यांचे इतरत्र केले जाणारे पुनर्रोपण पालिकेला पुढे खर्चिक ठरू लागल्याने पुन्हा ती तोडण्यास सुरुवात झाली. जेवढी झाडे तोडण्यात येतील, त्याच्या पाचपट झाडे लावण्याचा निर्णय प्रशासनाकडुन घेण्यात आला. परंतु गेल्या सहा वर्षांत तोडण्यात आलेल्या सुमारे ९ हजार ३६८ झाडांपैकी आतापर्यंत सुमारे ४ हजार ११८ झाडे नव्याने लावण्यात आल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. आरटीआय कार्यकर्ता कृष्णा यांनी वृक्षतोडीची माहिती पालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाकडे मागितली होती. त्यावर प्राप्त माहितीत तोडण्यात आलेल्या झाडांची संख्या २०११-१२ मध्ये ४११०, २०१२-१३ मध्ये १४३६, २०१३-१४ मध्ये ८९८, २०१४-१५ मध्ये सुमारे १ हजार, २०१५-१६ मध्ये सुमारे ११४६ व २०१६-१७ मध्ये सुमारे ७७८ इतकी नमुद करण्यात आली आहे. यातील २०११-१२ मध्ये उत्तन घनकचरा प्रकल्पातील तब्बल २ हजार झाडे तोडण्यात आली. या बदल्यात लावण्यात आलेली झाडांची संख्या सुमारे ४ हजार ११८ इतकीच असल्याचे समोर आले आहे. यात २०१४-१५ मध्ये लागवड केलेल्या बॉटलपाम झाडांची संख्या ४५२, पेल्ट्रोफारमची १५ झाडे, गुलमोहची १८, समुद्रफळाची २७९, नारळाची २१४, बदामाची ११५ व इतर २१ अशा १ हजार ११४ झाडांचा समावेश आहे.

पालिकेने २०११-१२ पासुन तोडलेल्या झाडांच्या मोबदल्यात लावण्यात आलेल्या झाडांचा तपशील थेट त्याच वर्षापासुन न देता तो २०१४-१५ पासुन दिला आहे. २०१५-१६ मध्ये १ हजार १४८ झाडे, २०१६-१७ मध्ये सुमारे १ हजार ८५६ अशा एकूण ४११८ झाडांची लागवड केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यात राज्य सरकारने गेल्या तीन दोन वर्षांत सुरू केलेल्या वनमहोत्सव अंतर्गत लागवड केलेल्या झाडांचा तपशील मात्र देण्यात आलेला नाही. दिलेल्या माहितीवरून पालिकेची वृक्षतोड मात्र जोरात तर वृक्षलागवड बेताची असल्याचे स्पष्ट झाले असून, प्रशासनाला पर्यावरणाशी कोणतेही देणेघेणे नसल्याचेही जाणवू लागल्याचा आरोप कृष्णा यांनी केला आहे.

Web Title: Mira-Bhairinder Municipal Corporation has done more than 9000 trees in last six years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.