मीरा-भार्इंदर महापालिकेतील नवनिर्वाचित स्टेशनरी देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 02:13 AM2017-09-07T02:13:04+5:302017-09-07T02:14:39+5:30

मीरा-भार्इंदर महापालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांच्या मानधनात वाढ होऊन ते दरमहा १० हजार एवढे झाले असले, तरी त्यांना स्टेशनरी मात्र पालिकेकडूनच छापून हवी आहे.

Mira-Bhairinder Municipal Corporation's demand for freshly set up Stationery | मीरा-भार्इंदर महापालिकेतील नवनिर्वाचित स्टेशनरी देण्याची मागणी

मीरा-भार्इंदर महापालिकेतील नवनिर्वाचित स्टेशनरी देण्याची मागणी

Next

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांच्या मानधनात वाढ होऊन ते दरमहा १० हजार एवढे झाले असले, तरी त्यांना स्टेशनरी मात्र पालिकेकडूनच छापून हवी आहे. आयुक्तांनी मात्र पालिकेचे लेटरहेड, व्हिजिटिंगकार्ड आणि एन्व्हलप देण्याचे ३ महिन्यांपूर्वीच बंद केल्याने त्यावरून नगरसेवक आक्रमक होण्याच्या पवित्र्यात आहेत. या स्टेशनरी छपाईसाठी वर्षाला साधारण ५ लाखांपर्यंत खर्च येत असे.
आधीच्या नगरसेवकांना शासन आदेशानुसार साडेसात हजार इतके मानधन दरमहा मिळत होते. त्यामध्ये लेखनसामग्री समाविष्ट असली, तरी महापालिकेच्या खर्चातूनच नगरसेवकांना लेटरहेड, एन्व्हलप आणि व्हिजिटिंगकार्ड छापून दिले जात होते.
काही नगरसेवक प्रभागातील कामे, समस्या तसेच काही उपक्रमांसाठीच पालिकेकडून मिळालेल्या स्टेशनरीचा वापर करत. परंतु, काही जण फुकट मिळते म्हणून वारेमाप लेटरहेड, व्हिजिटिंगकार्ड छापून घेत. विशेष म्हणजे आजही काही माजी नगरसेवक तेव्हा पालिकेकडून छापून घेतलेली व्हिजिटिंगकार्ड, लेटरहेड वापरताना दिसतात.
नगरसेवकांना दिल्या जाणाºया मानधनात लेखनसामग्रीचा समावेश असल्याने हे साहित्य छापून देणे बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने मध्यंतरी घेतला होता. मात्र, तेव्हादेखील ज्येष्ठ आणि नवख्या नगरसेवकांनी त्याला विरोध करत तुटपुंज्या मानधनात कसं परवडणार, असा पवित्रा घेत प्रशासनाला निर्णय अमलात आणण्यापासून रोखले होते. आतादेखील आयुक्तांनी विरोध केल्याने पुन्हा निवडून आलेले अनेक ज्येष्ठ नगरसेवक आणि नवनिर्वाचित नगरसेवकांनी लेटरहेड, व्हिजिटिंगकार्ड पालिकेकडूनच छापून मिळावे, म्हणून आग्रह धरण्यास सुरुवात केली आहे.
आयुक्तांनी जरी भांडार विभागाचा प्रस्ताव फेटाळला असला तरी येणाºया महासभेत या विषयावर चर्चा करून पालिकेकडूनच लेटरहेड, व्हिजिटिंगकार्ड छापून घेण्यासाठी नगरसेवकांनी फिल्डिंग लावली आहे.

Web Title: Mira-Bhairinder Municipal Corporation's demand for freshly set up Stationery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.