मीरा-भार्इंदरची ३० टक्के पाणीकपात रद्द

By admin | Published: January 7, 2016 12:39 AM2016-01-07T00:39:14+5:302016-01-07T00:39:14+5:30

मीरा-भार्इंदर शहराला लागू केलेली ३० टक्के पाणीकपात आ. नरेंद्र मेहता यांच्या प्रयत्नाने रद्द करण्याचा निर्णय ५ जानेवारीला राज्याच्या लाभ

Mira-Bhairinder's 30 percent watercourse canceled | मीरा-भार्इंदरची ३० टक्के पाणीकपात रद्द

मीरा-भार्इंदरची ३० टक्के पाणीकपात रद्द

Next

भार्इंदर : मीरा-भार्इंदर शहराला लागू केलेली ३० टक्के पाणीकपात आ. नरेंद्र मेहता यांच्या प्रयत्नाने रद्द करण्याचा निर्णय ५ जानेवारीला राज्याच्या लाभ क्षेत्र विकास विभागाचे सचिव शि.मा. उपासे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांमध्ये पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे शहराला दिलासा मिळणार असून राष्ट्रवादीच्या पाणीकपातीविरोधातील ८ जानेवारीच्या नियोजित आंदोलनाला चपराक बसली आहे.
शहराची लोकसंख्या १२ लाखांवर गेली असून या प्रमाणात शहराला स्टेम व एमआयडीसीकडून होणारा प्रत्येकी ८६ व ५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. राज्य शासनाने शहराला एमआयडीसी कोट्यातून अतिरिक्त १०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा मंजूर केला असून त्यातील २० दशलक्ष पाणीपुरवठा सुरू झाला आहे. उर्वरित ८० पैकी ५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा योजना मार्गी लागली असून ती कार्यान्वित होण्यासाठी सुमारे २ वर्षांचा कालावधी लागणार आहे. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात सध्याचा पाणीपुरवठा अपुरा असून तो वाढविण्यासाठी प्रशासनासह राजकीय पाठपुरावा सुरू आहे. परंतु, यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडल्याने शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या आंध्रा धरणात क्षमतेपेक्षा १४८ व बारवी धरणात सुमारे १४२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे या धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे नियोजन १५ जुलै २०१६ पर्यंत सुसह्य व्हावे, यासाठी ३० टक्के पाणीकपातीला सुरुवात केली आहे. पाणीपुरवठ्याच्या ठिकाणांहून शहर सुमारे ४५ किमी शेवटच्या टोकाला असल्याने अगोदरच होणारा पाणीपुरवठा सुमारे ५० तासांवर गेला असताना या कपातीमुळे शहरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. दरआठवड्याच्या बुधवार ते शुक्रवारदरम्यान पाणीकपातीमुळे खंडित होत असल्याने शनिवार ते रविवारी शहरात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत आहे. त्यामुळे शहरवासीयांना कपातीमधून वगळावे, अशी मागणी मेहता यांनी राज्य शासनाकडे केली होती. त्यानुसार शहराची पाणीकपात शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Mira-Bhairinder's 30 percent watercourse canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.