मीरा-भार्इंदरमध्ये पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:24 AM2018-07-28T00:24:08+5:302018-07-28T00:24:26+5:30

मंगळवारी लेखणीबंद आंदोलनाचा इशारा

Mira-Bhairinder's municipal officer, assaulted employees | मीरा-भार्इंदरमध्ये पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना मारहाण

मीरा-भार्इंदरमध्ये पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना मारहाण

Next

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या एका अधिकारी, कर्मचाºयास मारहाण करण्यात आली. या आरोपींना अटक करत शुक्रवारी मुख्यालयात काहीकाळ कामबंद आंदोलन केले. कर्मचाºयांच्या सुरक्षिततेसाठी ठोस कार्यवाही न केल्यास मंगळवारी सर्व पालिका कर्मचारी लेखणीबंद आंदोलन करतील, असा इशारा मीरा-भार्इंदर कामगारसेनेने दिला आहे.
मीरा रोड येथील प्रभाग समिती-५ चे प्रभाग अधिकारी नरेंद्र चव्हाण हे शांतीनगर सेक्टर-३ मध्ये बुधवारी दुकानांबाहेर वाढवलेल्या बेकायदा शेडवर कारवाईसाठी गेले होते. त्यावेळी पालिकेचे पोलीस, बाउन्सरही होते. कारवाईदरम्यान सिद्धान्त जैन याने कारवाईला विरोध करत चव्हाण यांच्याशी बाचाबाची व शिवीगाळ करत त्यांच्या उजव्या हाताची बोटे मोडली. यात चव्हाण यांचे एक बोट तुटले असून हाताला फ्रॅक्चर झाले आहे. याप्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात फक्त अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.
दुसºया घटनेत भार्इंदर पश्चिमेस प्रभाग समिती-१ मध्ये काम करणारे कर्मचारी राकेश त्रिभुवन हे काही दिवसांपूर्वी अतिरिक्त आयुक्त माधव कुसेकर यांच्यासोबत बेकायदा बांधकामांच्या आलेल्या तक्रारीनुसार पाहणी करण्यासाठी राई भागात आले होते. त्याचा राग धरून त्रिभुवन यांना त्यांचा वर्गमित्र निखिल सावंत याने भार्इंदर सेकंडरी शाळेसमोर बोलावले. पण, त्रिभुवन खालीच थांबले असता सावंत याने त्यास दुचाकीवर बसवून डोंगरी पोलीस चेकपोस्टपुढील एका हॉटेलजवळ बळजबरीने नेले. तेथे असलेल्या अमोल पाटील व विनोद नाईक यांनी त्रिभुवन यांना बेदम मारहाण केली.
इतकेच नव्हे, तर त्याला बळजबरीने पालिका अधिकारी व काही तथाकथित पत्रकारांना बेकायदा बांधकामांचे पैसे द्यावे लागतात, असे बोलायला लावून मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग केले.
या दोन्ही प्रकरणांमुळे अधिकारी, कर्मचाºयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिका आयुक्त व अधिकारी याप्रकरणी गप्प आहेत, तर दुसरीकडे पोलीस ठाण्यात गुुन्हे दाखल केले जात नसल्याने मीरा-भार्इंदर कामगारसेनेच्या वतीने आयुक्तांना निवेदन द्यायला शिष्टमंडळ गेले होते.
मात्र, आयुक्त नसल्याने सोमवारी त्यांची भेट घेतली जाणार आहे. अधिकारी, कर्मचाºयांच्या सुरक्षिततेसाठी ठोस कार्यवाही न झाल्यास मंगळवारी लेखणीबंद आंदोलन करू, असा इशारा सरचिटणीस सुलतान पटेल यांनी दिला आहे.

आयुक्तांकडून कारवाईचे नाव नाही
प्रभाग अधिकारी सुनील यादव यांना अर्वाच्य शिवीगाळ होऊनही आयुक्तांनी कारवाई केलेली नाही, असे सुलतान पटेल यांनी सांगितले. दरम्यान, भार्इंदर पोलिसांनी अमोल पाटील, विनोद नाईक, निखिल सावंत व अन्य एकाविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. नरेंद्र चव्हाण यांचा वैद्यकीय अहवाल व जबाब घेऊन सिद्धान्त जैन याच्यावर गुन्हा दाखल करू, असा पवित्रा पोलिसांनी घेतला आहे.

Web Title: Mira-Bhairinder's municipal officer, assaulted employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.