मीरा - भार्इंदरमध्ये राष्ट्रवादीची वाताहत?

By admin | Published: February 28, 2017 03:04 AM2017-02-28T03:04:12+5:302017-02-28T03:35:51+5:30

मीरा-भार्इंदरमध्ये राष्ट्रवादीची वाताहत होण्यास सुरुवात झाली आहे.

Mira-Bharindar's National Cavalant? | मीरा - भार्इंदरमध्ये राष्ट्रवादीची वाताहत?

मीरा - भार्इंदरमध्ये राष्ट्रवादीची वाताहत?

Next


भार्इंदर : मीरा-भार्इंदरमध्ये राष्ट्रवादीची वाताहत होण्यास सुरुवात झाली आहे. उरल्यासुरल्यांपैकी बहुतांश नगरसेवक भाजपा किंवा शिवसेनेत जाण्यासाठी वरिष्ठांच्या निर्णयाची प्रतीक्षा करीत असल्याचे समजते.
स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीत गटातटांचे राजकारण असल्यानेच पक्षाला अवकळा आल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. आमदारकीपासूनच पक्षांतराच्या प्रयत्नात असलेले माजी आ. गिल्बर्ट मेंडोन्सा आजही सेनेचे धनुष्यबाण हाती घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. परंतु, याला पक्षातूनच नकार समोर येतो आहे. मेंडोन्सा यांच्या सेनेतील प्रवेशामुळे स्थानिक नेतृत्वापुढे आव्हान निर्माण होणार असल्याने त्यांच्या प्रवेशाला ‘मातोश्री’वरून हिरवा कंदील मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
मेंडोन्सा सध्या ठाणे मध्यवर्ती कारागृहात असल्याने सुटकेनंतरच पक्षांतराची वस्तुस्थिती समोर येणार आहे. तूर्तास ती अफवा असल्याचे सांगण्यात येत असून यावर पडदा टाकण्याचे काम समर्थकांकडून सुरू आहे. मेंडोन्सांअभावी त्यांचे समर्थक सैरभैर झाल्याने ते कधी भाजपा, तर कधी सेनेच्या कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. माजी पालकमंत्री गणेश नाईक यांचे समर्थकही पक्षांतराच्या प्रतीक्षेत असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यासाठी नाईकांच्या निर्णयाची आस त्यांना लागली आहे.
२०१२ मधील पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे २९ उमेदवार निवडून आले होते. त्यातील माजी युवा जिल्हाध्यक्ष व नगरसेवक अ‍ॅड. रवी व्यास हे भाजपात गेले आहेत. पक्षाच्या आदेशाला सतत झुगारत नगरसेवक परशुराम म्हात्रे हे कागदोपत्री राष्ट्रवादीच असूनही भाजपाच्या कार्यक्रमात दिसतात. राष्ट्रवादीच्याच वंदना पाटील व अशोक तिवारी यांनीही राष्ट्रवादीच्याच बॅनरवर भाजपाच्या ‘सबका साथ सबका विकास’ या मोहिमेत सहभागी होणे पसंत केले आहे. (प्रतिनिधी)
।पक्षांतराच्या केवळ अफवा : पाटील
याबाबत, राष्ट्रवादीचे नगरसेवक व पालिकेचे माजी सभागृह नेते ध्रुवकिशोर पाटील म्हणाले, पक्षांतराचा निर्णय वरिष्ठांवरच अवलंबून असला तरी सध्या त्याच्या अफवा शहरात जोरात सुरू आहेत. असे काहीही होणार नाही.

Web Title: Mira-Bharindar's National Cavalant?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.