‘अमराठी महापौरा’विरुद्ध मीरा-भार्इंदरमध्ये आंदोलनास्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 04:08 AM2017-08-27T04:08:42+5:302017-08-27T04:08:53+5:30
मीरा-भार्इंदरच्या महापौरपदी येत्या मंगळवारी अमराठी नगरसेविकेची निवड होणार असल्याने मराठी एकीकरण समितीने आंदोलनास्त्र उगारले. मात्र, पोलिसांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनास परवानगी नाकारल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
भार्इंदर/मीरा रोड : मीरा-भार्इंदरच्या महापौरपदी येत्या मंगळवारी अमराठी नगरसेविकेची निवड होणार असल्याने मराठी एकीकरण समितीने आंदोलनास्त्र उगारले. मात्र, पोलिसांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनास परवानगी नाकारल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
सलग दुसºयांदा महापौरपदी अमराठीच होणार आहे. या पदावर यंदा मराठी लोकप्रतिनिधीची निवड करण्यात यावी, या मागणीसाठी समितीने आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. महापौरपदावर भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनी डिम्पल विनोद मेहता विराजमान होणार आहेत. याविरोधात होणाºया आंदोलनास पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे समितीने तूर्तास आंदोलन स्थगित केले. जमावबंदी आदेश उठल्यानंतर आंदोलन छेडणार असल्याचे समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी सांगितले.