मीरा-भार्इंदर निवडणूक : ९५ जागांसाठी आज मतदान, ५ लाख ९३ हजार ३४५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 03:35 AM2017-08-20T03:35:22+5:302017-08-20T03:35:30+5:30

गेल्या १० दिवसांपासून उडालेला प्रचाराचा धुराळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची टोलेबाजी या पार्श्वभूमीवर उद्या (रविवारी) मीरा-भार्इंदर महापालिकेच्या सार्वत्रिक

Mira-Bharinder Election: Voting for 95 seats today, 5,953 thousand 345 voters to exercise their right to vote | मीरा-भार्इंदर निवडणूक : ९५ जागांसाठी आज मतदान, ५ लाख ९३ हजार ३४५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार  

मीरा-भार्इंदर निवडणूक : ९५ जागांसाठी आज मतदान, ५ लाख ९३ हजार ३४५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार  

Next

मीरा रोड/भार्इंदर : गेल्या १० दिवसांपासून उडालेला प्रचाराचा धुराळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची टोलेबाजी या पार्श्वभूमीवर उद्या (रविवारी) मीरा-भार्इंदर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार आपला कौल देणार आहेत. एकूण २४ प्रभागांतील ९५ जागांसाठी होणा-या या निवडणुकीनंतर ५०९ उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद होणार आहे. सोमवारी मतमोजणी असून दुपारपर्यंत निकाल अपेक्षित आहे.
तब्बल ५ लाख ९३ हजार ३४५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्याकरिता ७७४ मतदान केंद्रांची व ३ हजार ६२६ मतदान यंत्रांची व्यवस्था केलेली आहे. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पालिकेने ४ हजार ७५० अधिकारी व कर्मचा-यांची नियुक्ती केली असून १६१ पोलीस अधिकाºयांसह १ हजार ८४२ पोलीस कर्मचारी व ३०० गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. मतदान केंद्रांतील घटना टिपण्यासाठी पालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.
राज्यातील सत्ताधारी भाजपा-शिवसेनेनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून काँग्रेसनेही बहुमताचा आकडा गाठण्याचा दावा केला आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेने १४ जागांवर विजय मिळवला होता. मनसेच्या एकमेव नगरसेवकानेही हाती धनुष्यबाण धरल्याने सेनेचे एकूण १५ नगरसेवक होते. त्यांची संख्या तिप्पट वाढवण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे. त्यासाठी शहर संपर्कप्रमुख आ. प्रताप सरनाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांना पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा. राजन विचारे व युवासेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक यांची साथ लाभली आहे.
भाजपा आ. नरेंद्र मेहता यांनीदेखील एकहाती सत्ता मिळवण्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा आणि मेहता यांच्या प्रयत्नांना राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व खा. कपिल पाटील यांची लाभलेली साथ यावर भाजपाचा भरवसा आहे. मुख्यमंत्र्यांनी या निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारार्थ दोन जाहीर सभा घेतल्या. गतवेळच्या ३२ जागांमध्ये दुप्पट वाढ करण्याचा मेहतांचा निर्धार आहे.
काँग्रेसने मीरा रोड व नयानगरमधील आपले बालेकिल्ले अबाधित राहतील व भाजपा-शिवसेनेला फटका बसून काँग्रेस एकहाती सत्ता प्राप्त करील, असा दावा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. स्थानिक नेतृत्व माजी आ. मुझफ्फर हुसेन निवडणुकीत यश संपादन करण्याकरिता जीवाचे रान करीत आहेत. मागील वेळी २६ जागा मिळवणाºया राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था बिकट असून त्या पक्षाची घसरण होऊन त्याचा लाभ अन्य पक्षांना होईल, अशी चर्चा आहे.

प्रचाराची रणधुमाळी शुक्रवारी सायंकाळी संपल्यानंतर उमेदवारांनी सोशल मीडियाद्वारे प्रचार सुरू ठेवला होता. काही ठिकाणी उमेदवार रात्रीचे फिरत आहेत, जेवणावळी सुरू आहे, पैसे वा भेटवस्तू वाटल्या जात आहेत, अशा परस्परविरोधी तक्रारी सुरूच होत्या. प्रभाग क्र. ५ मध्ये भाजपा उमेदवाराच्या भावाने धमकी दिल्याचा आरोप करत अन्य पक्षांच्या उमेदवारांनी नवघर पोलीस ठाण्यात एकत्र येत कारवाईची मागणी केली.

कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शहरात संचलन केले. पोलीस, होमगार्ड, राज्य राखीव दल तसेच दंगल नियंत्रण पथकाच्या जवानांनी त्यामध्ये भाग घेतला. ८० वाहनांच्या साहाय्याने पोलिसांनी निवडणूक काळातील बंदोबस्ताची मॉक ड्रील केली.

रात्री ११ नंतर शहरातील बार, हॉटेल, दुकाने, पानटपºया, हातगाड्या पोलिसांनी बंद केल्याने गेले दोन दिवस शहरात शांतता आहे. अनेक भागांत रात्रीच्या वेळी होणारा उपद्रव बंद झाला आहे. पोलिसांनी गुन्हे दाखल असणाºया शेकडो जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा बजावल्या असून काहींना हद्दपार केले आहे, तर काहींना ताब्यात घेतले आहे.

नागरिकांनी निर्भयपणे व कोणत्याही आमिष, दबावाला बळी न पडता मतदानाचा हक्क बजावावा. मतदान वा मतमोजणी वेळी कोणीही शांतताभंग करण्याचा प्रयत्न केल्यास त्याची गय केली जाणार नाही. - डॉ. महेश पाटील,
पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण

Web Title: Mira-Bharinder Election: Voting for 95 seats today, 5,953 thousand 345 voters to exercise their right to vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.