मीरा-भार्इंदरमध्ये आता चिन्हवाटपाचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 06:26 AM2017-08-08T06:26:04+5:302017-08-08T06:26:04+5:30

Mira-Bharinder's sign of mess | मीरा-भार्इंदरमध्ये आता चिन्हवाटपाचा गोंधळ

मीरा-भार्इंदरमध्ये आता चिन्हवाटपाचा गोंधळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीतील चिन्हवाटपाचा टप्पा सोमवारी पूर्ण झाला. यात अपक्षांसह लहान पक्षांच्या उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले. मात्र एकाच प्रभागातील, एकाच पॅनलमधील उमेदवारांना वेगवेगळे चिन्ह दिल्याने त्या पक्षांसह उमेदवारांत प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे.
वेगवेगळी चिन्हे देऊन मतदारांत गोंधळ उडवण्याचा हा प्रयत्न असून निवडणूक कार्यालयातील म्हणजेच पालिकेतील प्रशासन सत्ताधाºयांच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप उमेदवारांकडून होतो आहे.
यंदाच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उभ्या राहिलेल्या उमेदवारांना सिलिंडर, कपबशी, शिट्टी, बॅटरी, टेबल आदी चिन्हांचे वाटप करण्यात आले. त्यात बहुजन विकास आघाडीचाही समावेश आहे.
आ. विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम परिषदेच्या उमेदवारांना कपबशी व शिट्टीचे चिन्ह देण्यात आले. तत्पूर्वी परिषदेच्या प्रभाग १४ ड मधील एकमेव उमेदवाराने शिट्टी या चिन्हाची मागणी केली. त्यावेळी बहुजन विकास आघाडीचा उमेदवारही पक्षाच्या शिट्टी या चिन्हाच्या मागणीवर ठाम राहिल्याने निवडणूक प्रशासनाने अखेर चिट्ठी टाकली.
दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या राष्टÑीय समाज पक्षाच्या उमेदवारांनाही वेगवेगळ्या चिन्हाचे वाटप करण्यात आले.
मीरा-भार्इंदर संघर्ष मोर्चाच्या प्रभाग एकमधील चारही उमेदवारांच्या पॅनलला बॅट, टेबल, गॅस सिलिंडर, कपबशी अशी वेगवेगळी चिन्हे देण्यात आली. त्यावर मोर्चाचे अध्यक्ष शिवमूर्ती नाईक यांनी आक्षेप घेत मोर्चाच्याच बॅनरवर निवडणूक लढविणाºया पूर्ण पॅनलला समान निवडणूक चिन्ह देण्याची मागणी केली. वेगवेगळ्या चिन्हांमुळे मतदारांत संभ्रम होऊन मोर्चाच्या मतदानावर परिणाम होईल आणि प्रतिस्पर्धी उमेदवारांना त्याचा फायदा होईल, अशी शक्यता त्यांनी वर्तविली. त्यावर निवडणूक प्रशासनाने लहान व नवीन पक्षांना आयोगाने निश्चित केलेली चिन्हेच देण्यात येत असल्याचे सांगून मोर्चाचा दावा खोडून काढला.

उमेदवार नाराज

काँग्रेस, शिवसेना या राजकीय पक्षांनी पुरस्कृत उमेदवारांनाही वेगवेगळी चिन्हे दिल्याने त्यांनी ती नाखुषीनेच स्वीकारली. पुरस्कृत उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवित असल्याने त्यांना आयोगाच्या निर्देशानुसारच चिन्हवाटप झाले. या चिन्ह वाटपामुळे उमेदवार नाराज आहेत.

Web Title: Mira-Bharinder's sign of mess

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.