मीरा-भार्इंदरच्या क्रीडा संकुलाचे दार उघडणार!

By admin | Published: January 18, 2016 02:01 AM2016-01-18T02:01:16+5:302016-01-18T02:01:16+5:30

निविदा मागवूनदेखील प्रतिसाद मिळत नसल्याने फेब्रुवारी २०१४ पासून धूळखात पडलेले मीरा-भार्इंदर महापालिकेचे क्रीडा संकुल चालवण्यासाठी अखेर नवी

Mira-Bharinder's sports complex will open the door! | मीरा-भार्इंदरच्या क्रीडा संकुलाचे दार उघडणार!

मीरा-भार्इंदरच्या क्रीडा संकुलाचे दार उघडणार!

Next

मीरा रोड : निविदा मागवूनदेखील प्रतिसाद मिळत नसल्याने फेब्रुवारी २०१४ पासून धूळखात पडलेले मीरा-भार्इंदर महापालिकेचे क्रीडा संकुल चालवण्यासाठी अखेर नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनने तयारी दर्शवली आहे. होतकरू खेळाडूंसह नागरिकांसाठी सदर क्रीडा संकुल खुले व्हावे, याकरिता आयुक्त अच्युत हांगे यांनी पुढाकार घेतला आहे.
न्यू गोल्डन नेस्टजवळील मनपाच्या जागेत शहराचे पहिले क्र ीडा संकुल उभारण्याचा प्रस्ताव तत्कालीन खासदार संजीव नाईक यांनी मांडला होता. मे २०१२ मध्ये संकुलाचे भूमिपूजन झाल्यानंतर विलंबाने पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन फेब्रुवारी २०१४ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आमदार प्रताप सरनाईक यांच्या सहकार्याने कॅरमसारख्या स्पर्धा झाल्या. परंतु, अपूर्ण कामे व संकुल चालवण्यासाठी धोरण ठरले नसल्याने या संकुलाचे दरवाजे बंद होते.
या संकुलाच्या उर्वरित कामासाठी अजून ३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. आॅलिम्पिक दर्जाच्या तरणतलावासह लहान तरणतलाव, व्यायामशाळा, बॅडमिंटन, कॅरम, स्क्वॅश, बुद्धिबळ, टेबल टेनिस, बास्केटबॉल आदी खेळांचा समावेश आहे.
गेल्या वर्षी महासभेने क्र ीडा संकुल चालवण्यासाठीचे दर, निकष आदी धोरण निश्चित केले होते. त्यानंतर चार वेळा निविदा मागवून त्यास मुदतवाढ दिली. पालिकेने अनुदान देण्याची तयारीदेखील दर्शवली आहे. परंतु, राजकीय अपरिपक्वता व अनाठायी जाच लक्षात घेता सदर संकुल चालवण्यास कोणतीही संस्था पुढे यायला तयार नाही. सदर क्र ीडा संकुलाचे उद्घाटन होऊन दोन वर्षे होणार आहेत. शहरातील पालिकेचे पहिले क्र ीडा संकुल असून त्याची ही गत पाहून क्र ीडाप्रेमी नाराज आहेत. ती दूर होण्याची चिन्हे दिसत असून अलीकडेच आयुक्त दालनात नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनसोबत पहिली बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील, भगवती शर्मा उपस्थित होते.

Web Title: Mira-Bharinder's sports complex will open the door!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.