मीरारोडः दुर्लक्षित गल्ल्यांचे सुशोभीकरण करणार पालिका 

By धीरज परब | Published: June 21, 2023 03:47 PM2023-06-21T15:47:15+5:302023-06-21T15:48:29+5:30

लहान शोभेच्या झाड्यांच्या कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत . 

mira bhayandar municipality will beautify the neglected streets | मीरारोडः दुर्लक्षित गल्ल्यांचे सुशोभीकरण करणार पालिका 

मीरारोडः दुर्लक्षित गल्ल्यांचे सुशोभीकरण करणार पालिका 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत मीरा भाईंदर महापालिकेने आता शहरातील गल्ल्यांच्या सुशोभीकरणास सुरवात केली असून मीरारोडच्या अय्यप्पा मंदिर लगतच्या अश्याच एका गल्लीच्या सुशोभीकरण कामाचे लोकार्पण आयुक्त दिलीप ढोले यांनी केले . 

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरातील मुख्य रस्ते व मुख्य ठिकाणां जवळील भिंती विविध चित्र व रंगरंगोटीने सुशोभित केले जात आहेत . परंतु मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या अंतर्गत गल्लीबोळां मध्ये मात्र अस्वच्छता असल्याचे निदर्शनास आले. अश्या दुर्लक्षित गल्लीबोळात व्यसनी - गर्दुल्ले व उनाडांचे देखील बस्तान मांडलेले असते. 

त्यामुळे सह्या गल्ली बोळांना सुद्धा सुशोभित करण्याचा निर्णय आयुक्त ढोले यांनी घेतला . त्यासाठी मीरारोडच्या अय्यप्पा मंदिर मागील गल्लीच्या सुशोभीकरण कामाची सुरवात करण्यात आली . ह्या ठिकाणी पूर्वी अस्वच्छता असायची शिवाय उनाडांचा राबता असल्याने विशेषतः महिला - मुलीं मध्ये येथून जाणे भीतीदायक वाटायचे . 

मात्र आता या गल्लीचे रुपडेच पालटले आहे . भिंतींवर विविध आकर्षक चित्रं काढण्यात आली आहेत . तर फ्लोरिंग वर सुद्धा क्रिकेट , बुद्धिबळ , सापशिडी आदी विविध खेळांची चित्रे काढली आहेत . लहान शोभेच्या झाड्यांच्या कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत . 

या सुशोभित गल्लीच्या लोकार्पण वेळी आयुक्त ढोलेसंह अतिरिक्त आयुक्त डॉ . संभाजी पानपट्टे व अनिकेत मानोरकर, उपायुक्त मारुती गायकवाड, संजय शिंदे, रवि पवार व कल्पिता पिंपळे, स्वच्छता निरीक्षक अनिल राठोड सह अनेक माजी नगरसेवक , ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी, शालेय विद्यार्थी आदी उपस्थित होते. शहरातील प्रत्येक प्रभागात अश्या पद्धतीने गल्ल्यांचे सुशोभीकरण केले जाणार असल्याचे यावेळी आयुक्त म्हणाले . 

 

Web Title: mira bhayandar municipality will beautify the neglected streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.