पावसाच्या तडाख्याने मीरा भाईंदर गेले पाण्यात; शहरात सरासरी ८३ मिमी पावसाची नोंद

By धीरज परब | Published: September 16, 2022 07:13 PM2022-09-16T19:13:40+5:302022-09-16T19:16:25+5:30

घोडबंदर मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक जवळपास ठप्प झाली होती. 

mira bhayandar went into the water due to rain the city recorded an average rainfall of 83 mm | पावसाच्या तडाख्याने मीरा भाईंदर गेले पाण्यात; शहरात सरासरी ८३ मिमी पावसाची नोंद

पावसाच्या तडाख्याने मीरा भाईंदर गेले पाण्यात; शहरात सरासरी ८३ मिमी पावसाची नोंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड: मीरा भाईंदर शहरात गुरुवारी रात्री व शुक्रवारी दिवसभर जोरदार पाऊस पडल्यामुळे शहरातील बहुसंख्य परिसर पाण्याखाली गेला होता. घोडबंदर मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक जवळपास ठप्प झाली होती . 

गुरुवारी रात्री पासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने शुक्रवारी चांगलेच झोडपून काढले . धुंवाधार पावसा मुळे शहरातील बहुसंख्य परिसर पाण्याखाली गेलेच शिवाय घोडबंदर महामार्ग सुद्धा पाण्यात बुडाल्याने वाहतूक जवळपास ठप्प झाली होती . शहरात सकाळी १० ते दुपारी १ ह्या तीन तासात सुमारे ८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे सांगण्यात आले . 

भाईंदरच्या बेकरी गल्ली , नारायण नगर , राई - मोरवा मार्ग, बाळाराम पाटील मार्ग , तलाव मार्ग  सह अनेक भागात पाणी तुंबले होते . मीरारोडच्या शांती नगर , शीतल नगर , अमिषा पार्क , कृष्ण स्थळ, गीता नगर , हटकेश , मुन्शी कम्पाऊंड , माशाचा पाडा मार्ग परिसर , ग्रीन व्हिलेज आदी अनेक परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते . 

अनेक लोकांच्या घरात तसेच दुकान - व्यवसायायिक जागेत सांडपाणी व पावसाचे पाणी शिरले . शहरातील वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झाले होते . सुदैवाने दुपार नंतर पावसाचा जोर ओसरल्याने लोकांना दिलासा मिळाला . 

महापालिकेच्या नाले सफाईची पुन्हा पोलखोल झालीच शिवाय शहरात मोठ्या प्रमाणात चालणारी भरणी सुद्धा पुन्हा चिंतेचा विषय असल्याचे स्पष्ट झाले . 

Web Title: mira bhayandar went into the water due to rain the city recorded an average rainfall of 83 mm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.