मीरा भाईंदर मध्ये 8 दिवसात लॉकडाऊन उल्लंघनाचे 145 गुन्हे व 290 वाहने जप्त करून 608 लोकांवर कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 07:13 PM2020-07-09T19:13:47+5:302020-07-09T19:13:54+5:30

मीरारोड - मीरा भाईंदर मधील ६ पोलीस ठाण्यात गेल्या आठ दिवसात कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या निर्देशांचे उल्लंघन केल्या प्रकरणी 145 गुन्हे ...

In Mira Bhayander, 145 cases of lockdown violation and 290 vehicles were seized in 8 days and action was taken against 608 people. | मीरा भाईंदर मध्ये 8 दिवसात लॉकडाऊन उल्लंघनाचे 145 गुन्हे व 290 वाहने जप्त करून 608 लोकांवर कारवाई 

मीरा भाईंदर मध्ये 8 दिवसात लॉकडाऊन उल्लंघनाचे 145 गुन्हे व 290 वाहने जप्त करून 608 लोकांवर कारवाई 

Next

मीरारोड - मीरा भाईंदर मधील ६ पोलीस ठाण्यात गेल्या आठ दिवसात कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या निर्देशांचे उल्लंघन केल्या प्रकरणी 145 गुन्हे दाखल करण्यात येऊन 290 वाहने जप्त केली आहेत. नाहक फिरणाऱ्या 608 लोकांवर कारवाई केली आहे . 

मीरा भाईंदर मध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण आणि मृत्यूची संख्या पाहता लोकप्रतिनिधीं कडून सातत्याने पुन्हा लॉक डाऊनची मागणी केली जात होती . त्या अनुषंगाने 1 जुलै पासून 10 दिवसां करिता पुन्हा लॉक डाऊन केले गेले . ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ . शिवाजी राठोड व अपर अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शन खाली मीरा भाईंदर मध्ये पोलिसांनी पुन्हा नाकाबंदी आणि गस्त  वाढवली . शहरातील अनेक रस्ते बॅरेकेटींग करून बंद करण्यात आले . 

पोलिस उपअधीक्षक शांताराम वळवी आणि डॉ . शशिकांत भोसले यांच्या निर्देशा नुसार मीरा भाईंदर मधील 6 पोलिस ठाण्यांनी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे . सर्वात जास्त कारवाई काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांनी केली आहे . साथरोग नियंत्रण कायद्या प्रमाणे 41 गुन्हे दाखल केले असून 108 वाहनं जप्त केली. मॉर्निंगवॉक , मास्क नसणे यासाठी 205 जणांवर कारवाई केली . तर दारूबंदीचा 1 गुन्हा दाखल केला आहे . 

भाईंदरचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी 39 गुन्हे दाखल केले असून 74 वाहनं जप्त करून 121 लोकांवर कारवाई केली. दारूबंदीचा 1 गुन्हा दाखल केला . नवघरचे निरीक्षक संपत पाटील यांनी त्यांच्या हद्दीत 151 लोकांवर कारवाई करत 15 गुन्हे दाखल केले तर 16 वाहने जप्त केली . 

नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलास बर्वे यांनी 30 गुन्हे दाखल करून 52 वाहने जप्त केली व 88 लोकांवर कारवाई केली . मीरारोडचे वरिष्ठ निरीक्षक संदीप कदम यांनी 25 वाहने जप्त करत 15 गुन्हे दाखल करून 23 लोकांवर करवीर केली . उत्तन सागरीचे सहाय्यक निरीक्षक सतीश निकम यांनी 15 वाहने जप्त करून 5 गुन्हे दाखल केले व 19 लोकांवर कारवाई केली . दारूबंदीचा एक गुन्हा सुद्धा दाखल केल्याची माहिती डॉ . शशिकांत भोसले यांनी दिली . 

Web Title: In Mira Bhayander, 145 cases of lockdown violation and 290 vehicles were seized in 8 days and action was taken against 608 people.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.