मीरा भाईंदर भाजपाच्या आढावा बैठकीला बहिष्काराचे ग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 08:44 AM2020-09-15T08:44:50+5:302020-09-15T08:50:06+5:30

मीरा भाईंदरमध्ये भाजपा विरुद्ध मेहता समर्थक असा वाद चव्हाट्यावर आला आहे. 

Mira Bhayander BJP's review meeting boycott | मीरा भाईंदर भाजपाच्या आढावा बैठकीला बहिष्काराचे ग्रहण

मीरा भाईंदर भाजपाच्या आढावा बैठकीला बहिष्काराचे ग्रहण

Next

मीरारोड -  महापौरांच्या दालनात भाजपा नगरसेवकांच्या आढावा बैठकीला जाऊ नये म्हणून माजी आमदार आणि समर्थक नगरसेवकांकडून फोन केले जात असताना दुसरीकडे बैठकीला ३० नगरसेवकांनी उपस्थिती दाखवली. ८ ते १० नगरसेवकांनी फोन वा मॅसेज करून आपण पक्षासोबत असून बैठकीला येऊ शकत नसल्याचे कळवले. खुद्द जिल्हाध्यक्षांनी यास दुजोरा दिला आहे. यावरून मीरा भाईंदरमध्ये भाजपा विरुद्ध मेहता समर्थक असा वाद चव्हाट्यावर आला आहे. 

मीरा भाईंदर महापालिकेची मंगळवारी ऑनलाईन महासभा असून त्या अनुषंगाने सोमवारी महापौर ज्योत्सना हसनाळे यांच्या दालनात नगरसेवकांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. स्वतः भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी नगरसेवकांना बैठकीस हजर राहण्यास कळवले होते. महापौर दालनातून सुद्धा सकाळ पासून फोन केले जात होते. परंतु दुसरीकडे मेहता व त्यांच्या समर्थक नगरसेवकांकडून मात्र नगरसेवकांना सदर बैठकीस जाऊ नये असे फोन करून सांगितले जात होते. भाजपा पक्ष म्हणून जिल्हाध्यक्षांचे ऐकायचे की मेहतांचे ऐकायचे अशा कात्रीत देखील सापडल्याची खंत काही नगरसेवकांनी बोलून दाखवली. 

एकूण ३० नगरसेवक उपस्थित

दरम्यान आढावा बैठकीस जिल्हाध्यक्षांसह महापौर ज्योत्सना हसनाळे, सभागृह नेते रोहिदास पाटील, स्थायी समिती सभापती अशोक तिवारी, माजी उपमहापौर चंद्रकांत वैती, माजी सभापती मदन सिंह, रवी व्यास, विनोद म्हात्रे, सुरेश खंडेलवाल, डॉ . सुशील अग्रवाल, गणेश भोईर, दौलत गजरे सह एकूण ३० नगरसेवक उपस्थित होते. तसेच ८ ते १० नगरसेवकांनी आपण भाजपासोबत असून व्यक्तिगत कारणामुळे बैठकीला येऊ शकत नसल्याचे कळवले असे जिल्हाध्यक्ष म्हात्रे म्हणाले. नगरसेवकांना भाजपच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्यासाठी फोन केले जात असल्याचे विचारले असता म्हात्रे यांनी असे प्रकार आपल्या कानावर आल्याचे सांगितले. 

मेहता व समर्थकांकडून थेट भाजपाला आव्हान देण्याचा प्रकार

आढावा बैठकीमध्ये नगरसेवकांना बैठकीला जाऊ नका सांगण्याच्या प्रकारावरून संताप व्यक्त करण्यात आला. मेहता व समर्थकांकडून थेट भाजपा पक्षाला आव्हान देण्याचा हा प्रकार असल्याचे सांगण्यात आले. मेहता यांनी भाजपाची सर्व पदे सोडली असे स्वतःच जाहीर केले होते. तरी देखील त्यांचा हस्तक्षेप सुरूच आहे. ते स्वतः मात्र खाजगी संस्थेच्या माध्यमातून सक्रिय दाखवत भाजपाची कोंडी करत आहेत. पक्षाचे कार्यालय आजही पक्षाच्या नवे केलेलं नाही आदी मुद्दे चर्चिले गेल्याचे सूत्रांनी सांगितले. 

परिवहन सेवा, कर सवलत आदी प्रकरणात देखील पक्ष अडचणीत आला. पक्षाची प्रतिमा एका व्यक्ती मुळे बदनाम होत असल्याने याचे गंभीर परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसले तसेच पुढच्या पालिका निवडणुकीवर देखील होतील. पक्षाचा व्यक्तिगत स्वार्थ व खाजगी कंपनी प्रमाणे वापर खपवून घेतला जाणार नाही आदी अनेक मुद्द्यांवर बैठकीत नाराजी व्यक्त केली गेली असे सूत्रांनी म्हटले आहे.   

मेहता समर्थक नगरसेवक दिनेश जैन यांनी सांगितले की , मेहता वा आमच्याकडून कोणाही नगरसेवकास पक्षाच्या आढवा बैठकीला जाऊ नका असे सांगण्यात आलेले नाही. आम्ही पक्ष म्हणून सर्व एकत्र असून माझ्यासाठी जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे व नरेंद्र मेहता हे दोघेही नेतेच आहेत. या आधी आढावा बैठक परस्पर मेहतांच्या सी एन रॉक हॉटेलमध्ये ठेवल्याने जिल्हाध्यक्षांनी ती रद्द केली होती. नगरसेविका वैशाली रकवी यांच्या घरात जाऊन स्थायी समिती सदस्याचा राजीनामा घेण्याच्या प्रकारा वरून सुद्धा जिल्हाध्यक्ष सह अनेक नगरसेवक संतापले होते.

महत्त्वाच्या बातम्या

जय जिजाऊ, जय शिवराय! योगी सरकारच्या 'त्या' निर्णयावर फडणवीसांचं खास ट्विट, म्हणाले...

"मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा पद्धतशीर वापर केला जातोय"

"बिहार निवडणूक येताच महाराष्ट्राच्या बदनामीचं कारस्थान सुरू, हा 'पॅटर्न' यशस्वी होणार नाही"

"कोरोनामध्ये आत्मनिर्भर व्हा, स्वतःचा जीव स्वतःच वाचवा कारण पंतप्रधान मोरासोबत व्यस्त आहेत"

"कोरोना किट खरेदीमध्ये करोडोंचा भ्रष्टाचार", आपचा योगी सरकारवर हल्लाबोल

Web Title: Mira Bhayander BJP's review meeting boycott

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.