ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकासह चौघांना दीड कोटीच्या खंडणी प्रकरणी भाईंदरमध्ये अटक 

By धीरज परब | Updated: February 2, 2025 12:43 IST2025-02-02T12:42:47+5:302025-02-02T12:43:27+5:30

Mira-Bhayander Crime News: वरळी येथील एका एसआरए बांधकाम प्रकल्पाच्या व्यावसायिकाकडे दीड कोटीची खंडणी मागून १५ लाखांचा पहिला हप्ता घेताना नालासोपाऱ्याच्या माजी नगरसेवकासह चार जणांना भाईंदरच्या नवघर पोलिसांनी खंडणी प्रकरणी अटक केली आहे . 

Mira-Bhayander Crime News: Four people, including former corporator of Thackeray group, arrested in Bhayander in extortion case of Rs 1.5 crore | ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकासह चौघांना दीड कोटीच्या खंडणी प्रकरणी भाईंदरमध्ये अटक 

ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकासह चौघांना दीड कोटीच्या खंडणी प्रकरणी भाईंदरमध्ये अटक 

- धीरज परब
मीरारोड - वरळी येथील एका एसआरए बांधकाम प्रकल्पाच्या व्यावसायिकाकडे दीड कोटीची खंडणी मागून १५ लाखांचा पहिला हप्ता घेताना नालासोपाराचा माजी नगरसेवक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा तालुका प्रमुख स्वप्नील बांदेकर सह चार जणांना भाईंदरच्या नवघर पोलिसांनी खंडणी प्रकरणी अटक केली आहे . 

मुंबईच्या वरळी येथे आकाश गुप्ता यांचा सागर दर्शन हा एसआरए बांधकाम प्रकल्प आहे . सदर बांधकाम प्रकल्पा बाबत बांदेकर व साथीदार माहिती आधिकरात माहिती मागवत होते . प्रकल्प अडचणीत आणण्याची धमकी देऊन गुप्ता यांच्या कडे दिड कोटींची मागणी गेल्या ३ - ४ महिन्यां पासून करत होते . 

गुप्ता यांनी पहिला हप्ता म्हणून १५ लाख रुपये देण्याची तयारी दर्शवत बांदेकर ह्याला मुंबईला भेटायला सांगितले . मात्र मुंबईत भेटण्यास नकार दिला असता गुप्ता यांनी विरार भागात भेटण्याची तयारी दर्शवली असता त्याला देखील नकार देत भाईंदर पूर्व इंद्रलोक येथील बनाना लीफ हॉटेल मध्ये भेटण्याचे ठरले . 

गुप्ता यांनी सदर प्रकरणी पोलिसांना तक्रार अर्ज दिला होता . त्यानुसार उपायुक्त प्रकाश गायकवाड ,  नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक धीरज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी सायंकाळी बनाना लीफ हॉटेल येथे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक निरीक्षक अमोल तळेकर सह पथकाने सापळा रचला . 

स्वप्नील बांदेकर सह संतोष  काजरेकर, निखिल बोलेरो व हिमांशू शाह  हे आले व  गुप्ता यांच्या कडून १५ लाखांची खंडणी स्वीकारताच पोलिसांनी झडप घालून चौघांना अटक केली . शाह हा कांदिवलीचा राहणार असून बाकीचे आरोपी हे नालासोपारा परिसरात राहणारे आहेत .

Web Title: Mira-Bhayander Crime News: Four people, including former corporator of Thackeray group, arrested in Bhayander in extortion case of Rs 1.5 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.