रस्त्यावर धूळखात पडलेल्या वाहनांवर महापालिकेची कारवाई
By धीरज परब | Published: January 6, 2023 06:53 PM2023-01-06T18:53:04+5:302023-01-06T18:53:10+5:30
मीरारोडच्या नया नगर भागातील रस्त्यांवर धूळखात पडलेल्या वाहनांवर महापालिकेने जप्तीची कारवाई केली.
मीरारोड - मीरारोडच्या नया नगर भागातील रस्त्यांवर धूळखात पडलेल्या वाहनांवर महापालिकेने जप्तीची कारवाई केली. शहरात मुख्य रस्ते , गल्ली बोळात धुळखात पडलेली नागरिकांना रहदरीस तसेच वाहतुकीस अडथळात ठरत आहेत. शिवाय पडीक वाहनांमुळे तेथील साफसफाई होत नाही व कचरा - धूळ साचून अस्वच्छता दिसते. ह्या पडीक वाहनांवर तसेच त्या वाहन मालकांवर कायदेशीर कारवाई ची मागणी होत असते.
अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण
यांच्या निर्देशाने ४ चे प्रभाग अधिकारी योगेश गुणीजन, स्वच्छ्ता निरीक्षक अनिल राठोड, महेंद्र गावंड, फेरीवाला पथक प्रमुख सचिन साळुंके सह महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान व मजूर यांच्या पथकाने मार्फ़त नयानगर परिसरात रस्त्यावर धूळखात असलेल्या ६ रिक्षा, २ मोटार कार , २ टेम्पो अशी ८ बेवारस वाहने जप्त केली. जप्त केलेली वाहने पोलीस उपायुक्त कार्यालय जवळील पालिकेच्या मैदानात ठेवण्यात आली आहेत. बेवारस वहनांवर कारवाई करत २० हजारांचा दंड आकारण्यात आला आहे.