मिरा-भाईंदर महानगरपालिका : भाजपने केलेल्या नियुक्त्या स्थगित, नगरविकास विभागाने उचलले पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 08:48 AM2020-12-11T08:48:53+5:302020-12-11T08:49:44+5:30

Mira-Bhayander Municipal Corporation: मीरा भाईंदर महापालिकेच्या महासभेत सत्ताधारी भाजपने बहुमताच्या बळावर स्वीकृत सदस्य नियुक्ती व तदर्थ समिती सदस्य नियुक्ती करून शिवसेनेसह काँग्रेसला धक्का दिला होता.

Mira-Bhayander Municipal Corporation: Appointments made by BJP postponed, steps taken by Urban Development Department | मिरा-भाईंदर महानगरपालिका : भाजपने केलेल्या नियुक्त्या स्थगित, नगरविकास विभागाने उचलले पाऊल

मिरा-भाईंदर महानगरपालिका : भाजपने केलेल्या नियुक्त्या स्थगित, नगरविकास विभागाने उचलले पाऊल

googlenewsNext

मीरा राेड : मीरा भाईंदर महापालिकेच्या महासभेत सत्ताधारी भाजपने बहुमताच्या बळावर स्वीकृत सदस्य नियुक्ती व तदर्थ समिती सदस्य नियुक्ती करून शिवसेनेसह काँग्रेसला धक्का दिला होता. परंतु आ. गीता जैन यांच्या तक्रारीवरून नगरविकास विभागाने या दोन्ही ठरावांना पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती दिल्याने राज्यातील सत्ताधारी शिवसेनेचा हा भाजपला प्रतिधक्का मानला जात आहे.
मीरा भाईंदर महापालिकेत भाजपकडे पूर्ण बहुमत असून गेल्या सोमवारी झालेल्या महासभेत सत्ताधारी भाजपने पाणीपुरवठा व मलनिस्सारण, शिक्षण, समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार, क्रीडा व सांस्कृतिक, विधि आणि नियोजन, आरोग्य व वैद्यकीय साहाय्य, उद्यान व शहर सुशोभीकरण अशा चार तदर्थ समित्यांवर भाजप नगरसेवकांच्या नियुक्तीचे ठराव केले.
त्याविरोधात आ. जैन यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करून तदर्थ समित्या या जुलै २०१८ ते जुलै २०१९ या काळापुरत्याच होत्या. 
त्यामुळे त्या रद्द झालेल्या असून त्या पुन्हा स्थापन करण्यासाठी सभागृहात दोनतृतीयांश संख्याबळ आवश्यक होते. मात्र, तसे संख्याबळ नसताना भाजपने केवळ त्यांच्याच सदस्य नियुक्तीचा ठराव केल्यामुळे तो नियमबाह्य असल्याने विखंडित करण्याची मागणी केली होती.
स्वीकृत सदस्य नियुक्तीचा ठराव करताना भाजपने बहुमताच्या बळावर आयुक्तांनी प्रस्तावात दिलेल्या पाचपैकी भाजपचे तीन आणि काँग्रेसच्या एक अशा चार उमेदवारांचीच स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती 
केली. 
शिवसेनेच्या उमेदवारास त्याने कोरोना काळात जेवण पुरवण्याचे कंत्राट घेतल्याचा आक्षेप घेत त्याचे नाव वगळले. आ. जैन यांनी स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा ठरावही विखंडित करण्याची तक्रार मंत्र्यांकडे केली होती.
शहरात शिवसेना व भाजपमध्ये राजकारण तापू लागले आहे.

Web Title: Mira-Bhayander Municipal Corporation: Appointments made by BJP postponed, steps taken by Urban Development Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.