कर भरण्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेचे नवे वेब पोर्टल व मोबाईल ॲप 

By धीरज परब | Published: July 5, 2023 05:05 PM2023-07-05T17:05:55+5:302023-07-05T17:06:24+5:30

मीरा भाईंदर महापालिकेने शहरातील मालमत्ता धारक नागरिकांसाठी कर भरणासाठी माय एमबीएमसी ॲप सुरु केले होते .

mira bhayander municipal corporation new web portal and mobile app to pay taxes | कर भरण्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेचे नवे वेब पोर्टल व मोबाईल ॲप 

कर भरण्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेचे नवे वेब पोर्टल व मोबाईल ॲप 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने नागरिकांना कर भरण्यासाठी नवे वेब पोर्टल व मोबाईल ॲप तर नागरिकांसाठी सिटीझनॲप व मनपा अधिकारी , कर्मचाऱ्यांसाठी मॅनेजमेंट ॲप सुरू केले आहे.    

मीरा भाईंदर महापालिकेने शहरातील मालमत्ता धारक नागरिकांसाठी कर भरणासाठी माय एमबीएमसी ॲप सुरु केले होते . परंतु नागरिकांना अद्यावत ॲप देण्यासाठी आता जुने ॲप अनइन्स्टॉल करून नव्याने माय एमबीएमसी ॲप डाऊनलोड करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे . सदर ॲप प्लेस्टोर व महापालिका संकेतस्थळावरून डाउनलोड करता येणार आहे . कर भरल्या नंतर भरल्यानंतर आता पावती देखील लगेच ऑनलाईन मिळणार असून मोबाईलवर व इमेलवर तसा संदेश येणार आहे . पूर्वी कर भरणा साठी मालमत्ता क्रमांक टाकावा लागत होता. मात्र आता नावाने शोधले तरी कर देयक मिळणार आहे . 

महापालिकेने नागरिकांसाठी सिटीझन ॲप  व मनपा अधिकारी , कर्मचाऱ्यांसाठी मॅनेजमेंट ॲप सुरू केले आहे. या मध्ये प्रशासनाला मालमत्ता कर वसुली किती झाली याची माहिती रोज मिळणार आहे .  कर भरणा ठिकाणी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेऊन जेथे गर्दी जास्त असले तेथे कमी काम असलेल्या ठिकाणावरून कर्मचाऱ्यांना पाठवले जाईल जेणे करून नागरिकांना जास्त वेळ ताटकळत थांबावे लागणार नाही . 

संकेतस्थळ व ॲप हे बँक ऑफ बडोदा ने सीएसआर फंडातून महापालिकेला विनामूल्य बनवून दिले आहे. शिवाय बँकेकडून २० स्वॅप मशीन सुद्धा पालिकेला दिल्या आहे . खर्च न करता नागरिकांना चांगली सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिल्याची माहिती आयुक्त दिलीप ढोले यांनी दिली आहे.

कर वसुलीसाठी कर्मचारी आपल्या दारी 

कर वसुली साठी महापालिका कर्मचारी घरोघरी जाणार आहेत. विविध मोठे संकुल व परिसरात कर भरणा कॅम्पचे आयोजन केले जाणार आहे . कर्मचाऱ्यांना स्वॅप मशीन दिल्या जाणार असून कर  पावती दिली जाईल .  येत्या काही दिवसात फोन पे , गुगल पे वर सुद्धा कर भरणा सुविधा नागरिकांना मिळणार आहे . 

Web Title: mira bhayander municipal corporation new web portal and mobile app to pay taxes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.