मीरा भाईंदर महापालिकेचा फटाके विक्री परवाना घोटाळा, सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून नागरिकांच्या जीवाशी खेळत दिले परवाने 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2020 09:10 PM2020-11-14T21:10:49+5:302020-11-14T21:11:19+5:30

Mira Bhayander Municipal Corporation News :  भारतीय विस्फोटक कायदा १८८४ नुसार नागरीकांच्या जिवीत आणि मालमत्तेच्या सुरक्षेची काळजी घेणे महापालिका व पोलीसांना बंधनकारक आहे.

Mira Bhayander Municipal Corporation's firecracker sales license scam | मीरा भाईंदर महापालिकेचा फटाके विक्री परवाना घोटाळा, सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून नागरिकांच्या जीवाशी खेळत दिले परवाने 

मीरा भाईंदर महापालिकेचा फटाके विक्री परवाना घोटाळा, सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून नागरिकांच्या जीवाशी खेळत दिले परवाने 

Next

 मीरारोड -  मीरा भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन विभागा कडून नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी असलेले भारतिय विस्फोटक कायदा आणि उच्च न्यायालयाचे आदेशच फटाका विक्रेत्यांना बक्कळ फायदा करुन देण्यासाठी धाब्यावर बसवले आहेत.  मोकळ्या मैदानात फटाके विक्रीचे स्टॉल देण्या ऐवजी चक्क भर वसाहतीत , रहदारीच्या रस्त्या लगत फटाके विक्री स्टॉलना परवाने दिल्याने अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे . ृ

 भारतिय विस्फोटक कायदा १८८४ नुसार नागरीकांच्या जिवीत आणि मालमत्तेच्या सुरक्षेची काळजी घेणे महापालिका व पोलीसांना बंधनकारक आहे. त्यातच फटाके हे अतिशय ज्वलनशील असल्याने या आधी फटाके दुकानांना आगी लागुन झालेल्या जीवघेण्या दुर्घटना पाहता फटाक्यांच्या विक्री स्टॉल करीता काटेकोर नियम व निकष मुंबई उच्च न्यायालयाने घालुन दिले आहेत. 

परंतु अग्निशमन विभागाचे महापालिका उपायुक्त डॉ . संभाजी पानपट्टे आणि संबंधित अधिकारी वर्ग हे दर वर्षी भारतिय विस्फोटक कायदा आणि उच्च न्यायालयाचे आदेश सर्रास धाब्यावर बसवुन फटाके विक्री स्टॉलला परवाने देत आले आहेत . यात फटाके विक्री करणाऱ्यांना प्रचंड आर्थिक फायदा करून देण्यासाठी अर्थपूर्ण संगनमताने पालिका नियमबाह्य परवाने देत असल्याचे आरोप नवीन नाहीत . 

फटाके विक्री करण्यासाठी मोकळ्या मैदानां मध्ये परवानगी देणे तसेच नागरी वस्ती वा रहदारीचे रस्ते आदी पासुन फटाके स्टॉल लांब असणे आवश्यक आहे . पत्र्याच्या शेडचे स्टॉल तसेच तेथे अग्निशामक यंत्रणा बंधनकारक असते . तसे असताना महापालिकेने मात्र मयेकर मैदानाच्या नावाखाली प्रत्यक्षात कोणतेच मैदान नसताना भर रस्त्या लगत फटाके विक्रीचे ५ स्टॉना परवाने दिले आहेत . तसाच प्रकार भाईंदरच्या इंद्रलोक नाका, सिंघानिया मैदान , महेश नगर मैदान , पाटील मैदान , मीरारोडला  रेल्वे स्थानक जवळील मार्केट, सिल्व्हरपार्क विजय सेल्स जवळ , जांगीड सर्कल आदी भागात केलेला आहे . 

कहर म्हणजे पालिकेने पंडित भीमसेन जोशी कोरोना रुग्णालया समोरील मैदानाच्या नावाखाली रस्त्यालगत फटाके विक्री स्टॉल परवाने दिले आहेत . एकूणच अपवाद वगळता रहदारीच्या रस्त्यांलगत, नागरी वस्ती मध्ये तसेच मैदानं नसताना देखील बेधडक फटाके विक्री स्टॉलना परवानग्या दिल्या आहेत. 

या मुळे दुर्घटना घडल्यास नागरीकांची मोठय़ा प्रमाणात जिवीत वा वित्त हानी होण्याची शक्यता आहे. फटाके विक्रत्यांना बक्कळ फायदा करुन देण्यासह या मागे काही राजकिय मंडळी देखील गुंतली असल्याचे सूत्रांनी सांगितले . 

पालिका उपायुक्त डॉ . संभाजी पानपट्टे हे विभाग प्रमुख असून त्यांचाच ह्या बेकायदा फटाके विक्री परवाने देण्यात महत्वाचा हात आहे . या आधी देखील पात्रता नसताना त्यांनी अग्निशमन दलाचे परवाने मोठ्या प्रमाणात दिलेले आहेत . त्यामुळे नागरीकांच्या जीवाशी खेळत बोगस आणि बेकायदा फटाके विक्री परवाने देणाऱ्या पानपट्टे सह संबंधितांना निलंबित करून त्यांची भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली चौकशी करण्याची मागणी सत्यकाम फाऊंडेशनचे कृष्णा गुप्ता यांनी केली आहे . 

या प्रकरणी पानपट्टे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद होता . तर आयुक्त डॉ . विजय राठोड यांना फोन केला असता त्यांच्या कडून प्रतिसाद मिळाला नाही . अग्नीशमन दलाचे प्रभारी प्रकाश बोराडे म्हणाले कि , वरिष्ठांच्या मंजुरी व निर्देशा नुसार परवाने दिले जातात . आपण सर्व अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना फटाके स्टॉल ची पाहणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे .

Web Title: Mira Bhayander Municipal Corporation's firecracker sales license scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.