बेकायदा बांधकामांवर मीरा-भाईंदर महापालिकेचा हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 11:48 PM2020-10-10T23:48:04+5:302020-10-10T23:48:23+5:30

काशिमीरा भागातील इको-सेन्सेटिव्ह झोन व ना-विकास क्षेत्रात राजरोस बेकायदा बांधकामे होत आहेत.

Mira-Bhayander Municipal Corporation's hammer on illegal constructions | बेकायदा बांधकामांवर मीरा-भाईंदर महापालिकेचा हातोडा

बेकायदा बांधकामांवर मीरा-भाईंदर महापालिकेचा हातोडा

Next

भाईंदर : काशिमीरा भागातील २१ बेकायदा बांधकामांवर मीरा-भाईंदर महापालिकेने शुक्र वारी कारवाई केली. या भागात बेकायदा बांधकाम करणाऱ्या माफियांनी धुमाकूळ घातला असून प्रचंड मोठी झोपडपट्टी उभी राहिली आहे.

काशिमीरा भागातील इको-सेन्सेटिव्ह झोन व ना-विकास क्षेत्रात राजरोस बेकायदा बांधकामे होत आहेत. यातील बहुतांश जागा या आदिवासी वा सरकारी आहेत, तर काही पालिका आरक्षणातील व खाजगीही आहेत. येथे राजरोस बेकायदा बांधकामे उभी राहून त्याला करआकारणी, वीज व पाणीपुरवठ्यासह अन्य सुविधा मिळत असताना स्थानिक नगरसेवक, राजकारणी आणि पालिका अधिकारी मात्र ठोस कारवाईची भूमिकाच घेत नाहीत.

पालिका अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्याने आता आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी अतिक्र मण विभागाचे उपायुक्त अजित मुठे यांच्यावरच कारवाईची जबाबदारी सोपवली आहे. मुठे यांनीही प्रभाग अधिकाºयांना नोटीस बजावून कारवाई करायला लावणे सुरू केले आहे. शुक्र वारी पालिकेचे कनिष्ठ अभियंता संदीप साळवे व विकास शेळके यांनी काशिमीरा येथील दाचकूलपाडा, मीनाक्षीनगर परिसरातील बेकायदा २१ बांधकामांवर कारवाई केली. या ठिकाणी आवेश कुरेशी, मंगेश पाष्टे या माफियांनी केलेली बेकायदा बांधकामे पाडण्यात आली. बेकायदा बांधकामे करणाºयांवर एमआरटीपीनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुठे यांनी दिले आहेत.

 

Web Title: Mira-Bhayander Municipal Corporation's hammer on illegal constructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.