मीरा-भाईंदर महापालिका निवडणूक, भाजपाच्या उमेदवाराचा अर्ज रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 02:43 PM2017-08-04T14:43:59+5:302017-08-04T14:44:56+5:30

शांती नगर प्रभाग २० ब च्या भाजपा उमेदवार डॉ. नयना मनोज वसाणी यांनी शपथपत्रात गुन्ह्यांची माहिती देताना ७ वर्ष कारावास व द्रव्य दंडाच्या शिक्षेची तरतुद असलेले कलम लपवले

Mira-Bhayander municipal elections, cancellation of BJP candidate's candidature | मीरा-भाईंदर महापालिका निवडणूक, भाजपाच्या उमेदवाराचा अर्ज रद्द

मीरा-भाईंदर महापालिका निवडणूक, भाजपाच्या उमेदवाराचा अर्ज रद्द

googlenewsNext

मीरारोड, दि.  4 - मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत शांती नगर प्रभाग २० ब च्या भाजपा उमेदवार डॉ. नयना मनोज वसाणी यांनी शपथपत्रात गुन्ह्यांची माहिती देताना ७ वर्ष कारावास व द्रव्य दंडाच्या शिक्षेची तरतुद असलेले कलम लपवले तसेच शैक्षणिक पात्रता लपवली म्हणुन निवडणुक निर्णय अधिकारी यांनी वसाणी यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला आहे. या मुळे भाजपाला धक्का बसलाय.

मीरारोडच्या शांती नगर भागातील प्रभाग क्र. २० हा भाजपाला चांगलाच डोकेदुखीचा ठरलाय. भाजपाचे विद्यमान नगरसेवक दिनेश जैन यांना डावलुन आ. नरेंद्र मेहता यांनी शिवसेनेच्या प्रशांत दळवी यांना भाजपात घेत उमेदवारी अर्ज भरायला सांगीतला. त्यावरुन जैन यांनी थेट हक्काची उमेदवारी दिली नाही तर शिवसेनेत जाणार असा इशारा देताच दळवी यांना प्रभाग १७ मध्ये पाठवण्यात आले. परंतु जैन यांच्या सह भाजपाने भावेश गांधी यांना पण बी फॉर्म दिल्याने जैन यांची डोकेदुखी वाढवली. सुदैवाने जैन यांनी आधी अर्ज भरला असल्याने त्यांना भाजपाचा अधिकृत उमेदवार म्हणुन निवडणुक निर्णय अधिकारी यांनी जाहिर केले.

याच प्रभागातुन महिलांच्या इत्तर मागासवर्ग प्रवर्गातुन भाजपाने हेतल परमार यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगीतले. भाजपाचे पॅनल मधले अन्य उमेदवार दिनेश जैन, नगरसेविका डॉ. नयना वसाणी व नगरसेवक अश्विन कासोदरीया सह परमार अर्ज भरण्यास गेल्या असता त्यांना फोन करुन अर्जभरु नका म्हणुन भाजपा कडुन सांगण्यात आले. आ. मेहतांनी सुधीर कांबळी यांच्या पत्नीस अर्ज भरण्यास सांगीतले. पण अर्ज भरण्याची तयारी केली असता आयत्या वरती कांबळींचा पत्ता कापत परमार यांना उमेदवारी बहाल केली.

दरम्यान गुरुवारी दुपारी दिडच्या सुमारास छाननीच्या वेळी शिवसेनेच्या दिप्ती भट व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सीमा जैन यांनी वसाणी यांनी अर्जा सोबत जोडलेल्या शपथपत्रात व नंतर दिलेल्या अतिरीक्त शपथपत्रात गुन्ह्याची माहिती देताना भादविचे कलम ४५२ चा उल्लेखच केला नसल्याने त्यांचा अर्ज बाद करण्याची मागणी निवडणुक निर्णय अधिकारी अर्चना कदम यांच्या कडे केली.

कदम यांनी छाननी नंतर यावर सायं. ५ च्या सुामारस सुनावणी घेतली. वसाणी यांच्या वतीने आपण गुन्ह्याची माहिती लपवली नसुन सदरचे कलम जागा कमी असल्याने चुकुन राहिले व ती टायपिंग मिस्टेक असल्याचे सांगीतले.

तर सीमा जैन यांच्या वतीने अ‍ॅड. विक्रम तारे-पाटील यांनी युक्तीवाद करताना सर्वोच्च न्यायालयाच्या ५ फेब्रुवारी २०१५ च्या आदेशाचा संदर्भ दिला. उमेदवार निवडणुक लढत असताना लोकां कडुन मतं मागत असतो. त्यावेळेस विशेषत: गुन्ह्यां बाबतची सर्व माहिती देणे हा शपथपत्राचा मुख्य उद्देश आहे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटल्याचे तारे पाटील यांनी सांगीतले. वसाणी यांनी जाणुन बुजुन दोन वेळा शपथपत्रात या गंभीर कलमाची माहिती लपवली. दिप्ती भट यांच्या वतीने अ‍ॅड. धीरज श्रीवास्तव यांनी देखील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा मुद्दा लावुन धरला.

या मुळे राम नगर येथील कार्यालयात तसेच बाहेर भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी, कार्यकर्ते व उमेदवार मोठ्या संख्येने जमु लागले. भाजपाचे आमदार, नेते मंडळींनी देखील हजेरी लावली. गर्दी वाढत असल्याने पोलिस निरीक्षक धनाजी कलंत्रे व सहकारयांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना बाहेर काढले.

रात्री ८ वाजता निकाल देणार असे निवडणुक निर्णय अधिकारी अर्चना कदम यांनी म्हटले होते. पण मध्यरात्री त्यांनी आपला लेखी निर्णय दिला. कदम यांनी आपल्या निष्कर्षात उमेदवार वसाणी यांना संबंधित कलमा बाबत सुंपुर्ण माहिती होती. तरी देखील त्यांनी ती माहिती शपथपत्रात दर्शवली नाही. शिवाय त्यांच्या शैक्षणिक अर्हतेच्या रकान्यात त्यांनी स्वत:च्या शैक्षणिक पात्रतेचा उल्लेख न करता केवळ प्रोफेशनल असा उल्लेख केल्याचे देखील कदम यांनी समोर आणले. वसाणी यांनी कलम ४५२ चा उल्लेख जाणीवपूर्वक दोन्ही शपथपत्रात केला नाही व शिक्षणाची माहिती दिली असा निष्कर्ष काढत कदम यांनी वसाणी यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवला. या निर्णया मुळे उपस्थित भाजपाच्या गोटात खळबळ उडाली. वसाणी यांचा उमेदवारी अर्जच बाद झाल्याने भाजपाचे पॅनल अडचणीत आले आहे.दरम्यान वसाणी ह्या उमेदवारी अर्ज रद्द केल्याच्या निर्णया विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे.

Web Title: Mira-Bhayander municipal elections, cancellation of BJP candidate's candidature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.