मीरा-भाईंदर पालिकेकडुन वर्गीकरण न होणारा कचरा उचलण्यास बंद; वर्गीकरण न झालेला कचरा पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 07:01 PM2017-10-04T19:01:06+5:302017-10-04T19:01:40+5:30

मीरा-भार्इंदर महापालिकेने शहर स्वच्छतेच्या उद्दीष्टाने शहरातील कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण २ आॅक्टोबर पासुन शहरभर बंधनकारक केले असून, तसे निर्देश सफाई कामगारांना दिले आहेत.

 Mira-Bhayander police stopped the non-classified waste; The garbage unclassified | मीरा-भाईंदर पालिकेकडुन वर्गीकरण न होणारा कचरा उचलण्यास बंद; वर्गीकरण न झालेला कचरा पडून

मीरा-भाईंदर पालिकेकडुन वर्गीकरण न होणारा कचरा उचलण्यास बंद; वर्गीकरण न झालेला कचरा पडून

Next

- राजू काळे 
भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने शहर स्वच्छतेच्या उद्दीष्टाने शहरातील कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण २ आॅक्टोबर पासुन शहरभर बंधनकारक केले असून, तसे निर्देश सफाई कामगारांना दिले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी वर्गीकरण न झालेला कचरा उचलण्यात न आल्याने तेथे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.
केंद्र सरकारने जानेवारी २०१७ मध्ये स्वच्छतेचे सर्व्हेक्षण केल्यानंतर त्यात मीरा-भार्इंदर शहरातील कचरा वर्गीकरणावर ठपका ठेवण्यात आला होता. यामुळे स्वच्छतेतील अव्वल क्रमांकातुन शहर बाहेर फेकले गेल्याने प्रशासन नाराज झाले. ती उणीव यंदाच्या सर्व्हेक्षणात भरुन काढण्याचे प्रयत्न प्रशासनाने सुरु झाले आहेत. कचऱ्यानेच शहराचा घात केल्याचा रोष प्रशासनाने वर्गीकरणाच्या माध्यमातुन थेट नागरीकांवर ताणला आहे. यात पुरेशी जनजागृती महत्वाची ठरत असली तरी नागरीकांनी देखील त्याची सवय अंगवळणी पडावी, असा पारदर्शक उद्देश प्रशासनाने त्यामागे ठेवला आहे. पालिकेने त्यासाठी उत्तन येथील घनकचरा प्रकल्पात वर्गीकरणाची सोय उपलब्ध करुन दिल्याचे सांगण्यात येत आहे. सुका कचरा गोळा करण्यासाठी पालिकेने २४ गाड्या कंत्राटावर घेतल्या आहेत. मात्र वर्गीकरणाच्या प्रकल्पाला अद्याप सुरुवात करण्यात आलेली नाही. कचरा वर्गीकरणाप्रमाणे गोळा केला जात असला तरी पुढे तो घनकचरा प्रकल्पात एकत्रितपणे टाकला जात असल्याचे सुत्राकडुन सांगण्यात आले. यापुर्वी ती जून, जूलैमध्ये सुरु होणार असल्याचे सुतोवाच प्रशासनाकडुन करण्यात आले होते. कचरा वर्गीकरणासाठी प्रशासनाकडुन विविध माध्यमांद्वारे जनजागृती केल्याचा दावा केला जात आहे. परंतु, अनेकांना त्याची पुरेशी माहिती नसल्याने त्यांनी अद्यापही कचऱ्याचे वर्गीकरण न करता तो एकत्रितपणे साठविण्याची सवय कायम ठेवली आहे. यामुळे काही गृहनिर्माण संस्थांमध्ये खाजगी सफाई कामगारांकडुन उचलण्यात येणारा कचरा वर्गीकरणाअभावी दोन दिवसांपासुन उचललाच जात नसल्याने एकत्रितपणे साठविलेला कचरा आपसुकच कचरा कुंडीत टाकला जात आहे. याबाबत स्वच्छता विभागाचे उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी सांगितले कि, कचऱ्याच्या वर्गीकरणाअभावी यापूर्वी देखील कचरा उचलण्यात आला नव्हता. यानंतरही ज्यांनी कचऱ्याचे वर्गीकरण केलेले नाही. तो कचरा २ आॅक्टोबरपासुन उचलण्यास मनाई करण्यात आली आहे. हा प्रकार कायम राहिल्यास संबंधित गृहनिर्माण संस्थांचा पाणीपुरवठा खंडीत करण्याचा कार्यवाही केली जाणार आहे. तसेच सफाई कामगार नेते दिलीप गोतारणे यांनी, पालिकेने यापूर्वी देखील एकत्रित कचरा उचलण्यास मनाई केली होती. परंतु, राजकीय ओरड सुरू होताच पुन्हा एकत्रित कचरा उचलण्यास सुरुवात झाली. यंदाही प्रशासनाने दिलेले सरसकट निर्देश राजकीय दबावाखाली सापडु नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Web Title:  Mira-Bhayander police stopped the non-classified waste; The garbage unclassified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.